Kolhapur शांतिनिकेतन स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या अनुप्रिया अमितकुमार गावडे या विद्यार्थीनीने यशाचे नवे शिखर गाठत आपल्या नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड India Book of Records व एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली.8 वर्ष 8 महिन्याच्या अनुप्रियाने भारतीय घटनेतील प्रस्तावना, भाग 1, 2 व 3 मधील 35 कलमे व उपकलमे 6 मिनीट 10 सेकंदात पठण केल्यामुळे तिच्या नावाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली व तिला ग्रँड मास्टर हा किताब बहाल करण्यात आला आहे. 

Must Read 


कोल्हापूरसह संपूर्ण देशाचे नाव एशिया खंडामध्ये कोरले गेले आहे. वक्तृत्वात आवड असलेल्या अनुप्रियाने अनेक बक्षीस मिळवित शाळेचा बेस्ट स्पीकरचा बहुमानही यापूर्वी पटकाविला होता.अनुप्रीयाने गणित ऑलिम्पियाड परीक्षेत जगात आठवा क्रमांक, आय क्यु ऑलिम्पियाड परीक्षेत देशात दहावा तर ब्रेनडेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत देशात 17 वा क्रमांक पटकावित कोल्हापूरचे नाव उज्वल केले होते.

चाटर्ड अकौंटंट अमितकुमार गावडे व प्रा. डॉ.अक्षता गावडे यांची ती कन्या आहे. तिला शांतिनिकेतन शाळेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील, डायरेक्टर सौ. राजश्री काकडे, प्राचार्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.