Main Featured

करीना कपूरची वहिनी होणार ही प्रसिद्ध अभिनेत्री

Bollywood news
Entertainment news
- लॉकडाऊन आणि कोरोनामुळे बीटाऊनमधील ग्रँड लग्न यंदा छोटेखानी होऊ लागली आहेत. अनेक कलाकारांनी त्यांचा विवाहसोहळा उरकून घेतला आहे. दरम्यान आता अशी माहिती मिळते आहे की बॉलिवूडमध्ये (Bollywood) ज्यांच्या डेटिंगबाबत चर्चा सुरी आहे,असं स्टार कपल तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि आदर जैन (Aadar Jain) देखील लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल लपवून ठेवले नव्हते. सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. मात्र सध्या सिनेविश्वात त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. दोघेही लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याचे बोलले जात आहे. 


Must Read

1) उद्योग क्षेत्रातील कामगारांना वेतनवाढ मिळण्याची शक्यता

2) आमिर खानच्या मुलीने दिली इन्स्टाग्रामवर धमकी...

3) अ‍ॅमेझॉन अन् फ्लिपकार्टला मनसेचा इशारा

4) लग्नाचं आमिष दाखवून रेपचा आरोप; मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलासह पत्नीवर गुन्हा

5) मंत्रालय, स्वारगेट, कोल्हापूर, अलिबागसाठी ५० शिवशाही

6) 'वर्क फ्रॉम होम'मुळे सायबर गुन्ह्यात मोठी वाढ


आदर जैन हा ऋषी कपूर यांची सख्खी बहिण रिमा जैन यांचा धाकटा मुलगा. आदर आणि रणबीर केवळ भावंड नसूल जवळचे मित्र देखील आहे. कुटुबातील विविध कार्यक्रमात त्यांची मैत्री दिसून येते. दरम्यान कपूर-जैन कुटुंबातील या कार्यक्रमांमध्ये 'तारा सुतारिया' देखील दिसू लागल्याने त्याच्या नात्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होते आहे.(Entertainment news)

सध्या कपूर कुटुंबातून एकापाठोपाठ एक लग्नाच्या बातम्या येण्याची शक्यता चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) गेले काही महिने एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे आलिया आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) च्या लग्नाची चर्चा होती. मात्र त्याआधी आदर लग्नाच्या बेडीत अडक्याची शक्यता आहे.

2019 मध्ये तारा सुतारियाने 'स्टुडंट ऑफ द इयर-2' मधून बॉलिवूडमध्ये (bollywood)पदार्पण केलं होतं. आदरने अद्याप बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली नाही आहे. त्याचा मोठा भाऊ अरमान जैनने गेल्याचवर्षी त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर लग्न केलं होतं. आदर आणि ताराचे लग्न ठरल्यास कपूर कुटुंबासाठी ही महत्त्वाची बाब असेल. अनेक फॅमिली फंक्शनमध्ये देखील ते एकत्र दिसतात. तर ताराने त्याच्या वाढदिवशीच त्या्ंच्या रिलेशनशीपबाबत सांगितले होते. आदर देखील तिच्या फोटोंवर विविध कमेंट करत असतो.