kangana ranuat
entertainment news- कोरोना काळात (corona)सर्व सिनेमांच्या शूटिंग आणि रिलीज बंद होत्या. मात्र आता अनलॉकच्या नियमा अंतर्गत हळूहळू जगजीवन पूर्ववत होते आहे. सिनेमांच्या शूटिंगला देखील कलाकारांनी सुरुवात केली आहे. कंगना राणौतही (kangana ranaut)काही दिवसांपूर्वी थलायवीच्या सेटवर परतली आहे. जय ललिता यांच्या बायोपिकमधील क्लायमॅक्स शूट करण्यासाठी मेकर्सना पुन्हा तयारी करावी लागली. 

Must Read

पोस्टाच्या या योजनांमध्ये गुंतवणूक ठरेल फायद्याची

मेकर्सना या बायोपिकचा क्लायमॅक्स जवळपास 350 लोकांच्या गर्दीत शूट करायचा होता. अनलॉकच्या गाईडलाईन्सनुसार आता सेटवर फक्त एकावेळी 33 टक्के क्रू सोबत काम करण्याची परवानगी आहे. त्यामुळे दिग्दर्शकाने सिनेमाचे सीक्वेंस पूर्णपणे थांबवला आहे, जोवर परिस्थिती सर्वसामान्य होत या सीनला शूट करण्याची परवानगी मिळत नाही. (entertainment news)

बाकी शूटिंग पूर्ण झाली आहे आता मेकर्स फक्त क्लायमॅक्स शूट करण्याची वाट बघत आहेत.या सीक्वेन्सशिवाय अलीकडेच कंगना रनौतने एका गाण्याचे शूट केल्याचीही बातमी आहे. कंगानाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते. ज्यात ती दिग्दर्शक एएल विजय यांच्यासोबत उभी दिसत होती.कंगनाने  (kangana ranaut) ८८व्या वायूसेना दिवसाचे औचित्य साधत आगामी सिनेमा तेजस सिनेमाचे पोस्टर रिलीज केले होते. भारतीय वायूसेनेने २०१६ साली महिलांना लडाखू भूमिकेत सहभागी करण्याचा निर्णय घेतला होता. आता कंगनाचा आगामी चित्रपट तेजस याच ऐतिहासिक घटनेने प्रेरीत आहे. चित्रपटाच्या माध्यमातून वायूसेनेच्या धैर्याला सलाम केला जाणार आहे.