Kangana Ranaut

Entertainment News- अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut)आपल्या विरोधकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. ती अनेक नाव न घेता ती कधी कधी असा टोमणा मारते की, कळतही नाही. बॉलिवूडमध्ये ड्रग्सच्या वापरावरून चांगलाच वाद पेटला होता. कंगना म्हणाली होती की, बॉलिवूडमध्ये जास्त प्रमाणात ड्रगचा वापर होतो. आता कंगना रणौतने एक व्हिडीओ शेअर (share video on social media)करत जया बच्चन यांच्या थाळीच्या वक्तव्यावर चिमटा काढला आहे.

Must Read

1) उद्योग क्षेत्रातील कामगारांना वेतनवाढ मिळण्याची शक्यता

2) आमिर खानच्या मुलीने दिली इन्स्टाग्रामवर धमकी...

3) अ‍ॅमेझॉन अन् फ्लिपकार्टला मनसेचा इशारा

4) लग्नाचं आमिष दाखवून रेपचा आरोप; मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलासह पत्नीवर गुन्हा

5) मंत्रालय, स्वारगेट, कोल्हापूर, अलिबागसाठी ५० शिवशाही

6) 'वर्क फ्रॉम होम'मुळे सायबर गुन्ह्यात मोठी वाढ


कंगना रणौत यावेळी आगामी 'तेजस' आणि 'धाकड' सिनेमाची तयारी करत आहे. दोन्ही सिनेमात कंगना जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. या व्हिडीओत कंगना ट्रेनिंग घेताना दिसत आहे. कंगनाचा हा अंदाज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचं कारण वेगळं आहे.(Entertainment News)कंगनाने या व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिले आहे की, 'मी माझ्या आगामी 'तेजस' आणि 'धाकड' सिनेमासाठी अ‍ॅक्शन ट्रेनिंग सुरू केली आहे. एका सिनेमात सैनिक आहे तर एका सिनेमात गुप्तहेर आहे. बॉलिवूडच्या थाळीने मला खूप काही दिलं आहे. पण मणिकर्णिकानंतर मीच बॉलिवूडला त्यांची पहिली अ‍ॅक्शन हिरोईन दिली आहे'. 

आता कंगना स्वत:ला बॉलिवूडची पहिली अ‍ॅक्शन हिरोईन मानत असल्याने नवा वाद पेटत आहे. कंगनाने तशा तर अनेक भूमिका साकारल्या आहेत. पण ती पहिली अ‍ॅक्शन हिरोईन असल्याचं सर्वांनाच मान्य नाही. सोशल मीडियावर (share video on social media) यावरूनच वाद पेटला आहे. तसेच या पोस्टमध्ये कंगनाने जया बच्चन यांच्या थाळी वक्तव्यावरही चिमटा काढला आहे.

दरम्यान कंगना रणौतने नुकतीच तिच्या आगामी 'थलाइवी' सिनेमाच्या शूटींग पूर्ण केलं आहे. या सिनेमाच्या भूमिकेमुळेही ती चर्चेत आहे. या सिनेमाची उत्सुकताही चांगलीच वाढली आहे. तिचा या सिनेमातील लूक सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. ती या सिनेमात दिवंगत जयललिता यांची भूमिका साकारणार आहे.