Main Featured

“पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमत नाही का?”

kangana ranautआपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतविरोधात (kangana ranaut) एफआयआर दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. कंगना आणि तिची बहिण रंगोली सोशल मीडियाद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. 

त्यामुळे या प्रकरणी वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना कंगनाविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान या एफआयआरवर कंगनाने प्रतिक्रिया दिली. “पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमत नाही का?” असा उपरोधिक टोला तिने लगावला आहे.

Must Read

1) उद्योग क्षेत्रातील कामगारांना वेतनवाढ मिळण्याची शक्यता

2) आमिर खानच्या मुलीने दिली इन्स्टाग्रामवर धमकी...

3) अ‍ॅमेझॉन अन् फ्लिपकार्टला मनसेचा इशारा

4) लग्नाचं आमिष दाखवून रेपचा आरोप; मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलासह पत्नीवर गुन्हा

5) मंत्रालय, स्वारगेट, कोल्हापूर, अलिबागसाठी ५० शिवशाही

6) 'वर्क फ्रॉम होम'मुळे सायबर गुन्ह्यात मोठी वाढ


“कोण कोण नवरात्रीमध्ये उपवास करणार आहे? आज नवरात्रीच्या निमित्ताने काढलेले हे फोटो पाहा. मी देखील उपवास ठेवणार आहे. माझ्यावर आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) पप्पू सेनेला माझ्याशिवाय काहीच दिसत नाही. माझी जास्त आठवण काढू नका. मी लवकरच येतेय.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने प्रतिक्रिया दिली. या ट्विटच्या माध्यमातून तिने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.


वांद्रे कोर्टात कंगनाविरोधात  (kangana ranaut)  दोन व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय ती हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढही निर्माण करत आहे. 

कंगना वारंवार आक्षेपार्ह ट्विट करत असून यामुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडीओ सादर केले. त्यानंतर कोर्टाने कलम १५६ (३) अंतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.