श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर दरवर्षी नवरात्र काळात जोतिबा देवाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. पण यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे जोतिबा डोंगरावर येण्यासाठी भाविकांना बंदी घातल्यामुळे नवरात्रात गजबजणारा जोतिबा डोंगर आज रविवार असूनही शांतच होता. डोंगरावर बंदोबस्तासाठी असणारे पोलीस ठिकठिकाणी दिसत होते. मात्र जोतिबा डोंगराच्या बोहर येण्या जाण्याच्या मार्गावर पोलीसांनी नाकाबंदी केल्यामुळे भाविकांना प्रवेश दिला नाही. 

Advertise

Must Read

1) कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आता सोशल मिडीयावर

2) राज्यपालांचा पॉलिटीकल एजंटसारखा वापर; राऊतांचा टोला

3) प्रत्येक स्त्रीमध्ये आहे 'दुर्गा'; लक्षवेधी रुपातील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

4) WhatsApp मध्ये समस्या आल्यास आता तक्रार थेट कंपनीकडे करा

5) न्यूडल्स तयार करता करता तरुणीनं केला भन्नाट डान्स, VIDEO पाहून व्हाल हैराण

डोंगरावर दरवर्षी समईत तेल घालून कडाकण्यांचा नैवद्य देण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक येतात. यामुळे लाखो रुपयांची उलाढाल होते, पण यंदा मात्र कोरोनामुळे आर्थिक उलाढाल थंडावली. चैत्र यात्रेपासून डोंगरावरील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. नवरात्र उत्सवात तरी  मंदिर खुले होतील अशी त्यांची अशा सगळ्यांना होती पण प्रशासनाने संसर्ग वाढण्याचा धोक असल्याने नवरात्र उत्सवासही बंदी घातली. 

दरम्यान आज नवरात्र उत्सवातील दुसऱ्या दिवशी ज्योतिबा देवाची तीन पाकळी सोहन कमलपुष्प तील महापूजा बांधण्यात आली. ही महापूजा समस्त दहा गावकरी आणि पुजारी वर्गानी बांधली. मंदिरात सकाळी धुपारती सोहळा झाला. सकाळी दहा वाजता तो मुळमाया श्री. यमाई  मंदिराकडे गेला. या ठिकाणी विविध धार्मिक विधी झाले. ग्रामस्थांनी घरातूनच या सोहळ्याचे दर्शन घेतले.