Jal Pujan at the hands of Dhananjay Munde

शहराला पाणी पुरवठा (Water supply) करणाऱ्या नागापूर तालूक्यातील वाण धरण तीन वर्षानंतर १०० टक्के भरले. त्यामुळे शनिवारी सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते धरण परिसरात जलपूजन करण्यात आले.

Must Read

पोस्टाच्या या योजनांमध्ये गुंतवणूक ठरेल फायद्याची

यावेळी आ. संजय दौंड, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक कराड, जि. प. गटनेते अजय मुंडे, युवक नेते अभय मुंडे, दिपक देशमुख, बाजीराव धर्माधिकारी, शरद मुंडे, श्रीकृष्ण कराड, मोहन सोळंके, सूर्यभान मुंडे, उपसभापती पिंटू मुंडे, अंबाजोगाईचे सभापती प्रशांत जगताप, रवी मुळे, विनोद जगतकर, वैजनाथ बागवाले, नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन कुलकर्णी, तहसीलदार विपीन पाटील, न. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे, जलसंपदा विभागाचे अभियंता सिरसाट, गुलभिले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

यावर्षी वाण धरण भरल्याने परळी व परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपला आहे. तरीही भविष्यात दुष्काळामुळे वाण धरण कोरडे पडल्यास परळी शहराला पाणी टंचाई भासू नये, यासाठी नाथरा फाटा येथून जाणाऱ्या माजलगाव कालव्याला पाईपलाईन करून जायकवाडीचे पाणी  वाण धरणात आणणे हा आपला प्रयत्न आहे. त्यासाठीच जलसंपदा मंत्री  जयंत पाटील यांच्यासोबत नुकतीच एक बैठक झाली असल्याचे,  धनंजय मुंडे यांनी सांगितले.