A-big-blow-to-Russell

Sport
न्यूझीलंड दौऱ्यासाठी वेस्ट इंडिज कसोटी आणि टी 20 संघाची घोषणा करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये IPL कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात असलेल्या कॅरेबियन स्टारला संघातून वगळण्यात आले आहे. इंग्लंड दौऱ्यावर संघासोबत नसलेल्या चेहऱ्यांना न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे.  

वेस्ट इंडिज संघात शिमरॉन हेटमायर, कीमो पॉल आणि डॅरेन ब्रावो यांना स्थान देण्यात आले आहे. वेस्ट इंडीज कसोटी संघात 15 खेळाडूंशिवाय 6 राखीव खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या  कायल मेयर्सला टी 20 संघात स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाय आंद्रे फ्लेचरचे 2018 नंतर संघात पुनरागमन झाले आहे.  आंद्रे रसेल, लेंडल सिमंस आणि इविन लुईस यांना बोर्डाने या दौऱ्यासाठी पसंती दिलेली नाही.   

Advertise

वेस्ट इंडिज क्रिकेटने न्यूझीलंडमध्ये दोन कसोटी सामन्यांची तीन टी20 सामन्यांची मालिका खेळण्याची तयारी दर्शवली आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस विंडीजचा संघ न्यूझीलंड दौऱ्याला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य प्रोटोकॉलसह सामने खेळवण्याच्या अटीवर न्यूझीलंड सरकारने या दौऱ्याला परवानगी दिली आहे. 

वेस्ट इंडिज संघ
कसोटी टीम:
 जेसन होल्डर, जरमेन ब्लॅकवुड, क्रॅग ब्रॅथवेट, डॅरेन ब्रावो, शमराह ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, रहकीम कॉर्नवॉल, शेन डॉवरिच, शॅनन गॅब्रिएल, शिमरोन हेटमायर, कीमार होल्डर, अल्झारी जोसेफ, कीमो पॉल, कीमार रोच.

राखीव खेळाडू: एनक्रुमाह बोनर, जोशुआ डा सिल्वा, प्रेस्टन मॅकस्वीन, शेन मोसेली, रॅमन रिफर, जेडन सील्स.

टी 20 टीम: केरॉन पोलार्ड, फॅबियन एलेन, ड्वेन ब्रावो, शेल्डन कोट्रेल, आंद्रे फ्लेचर, शिमरोन हेटमायर, ब्रेंडन किंग, कायल मेयर्स, रॉवमॅन पॉवेल, कीमो पॉल, निकोलस पूरन, ओशेन थॉमस, हेडन वॉल्श जूनियर, केसरिक विलियम्स.