Main Featured

IPL 2020- 6 सामन्यातच IPL 2020 मधून बाहरे पडला 'हा' संघ!

IPL 2020 Pointableआयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामात आतापर्यंत प्रत्येक संघाचे 5 ते 6 सामने झाले आहेत. त्यामुळे आता प्ले ऑफसाठी शर्यत सुरू झाली आहे. गुणतालिकेत (IPL 2020 Pointable) पहिल्या 4 मध्ये येण्यासाठी सर्व संघाचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना 6 सामन्यातच एका संघाचे आयपीएल जिंकण्याचे स्वप्न जवळजवळ तुटले आहे. हा संघ आहे किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab). पंजाबचा हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात 69 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

Must Read

1) मराठा संघटनांकडून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे

2) आता येतंय Green Ration Card

3) टीव्ही टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश; ‘रिपब्लिक’सह ३ चॅनल्सची चलाखी

4) क्रीडा विभागातून कुस्तीपटू बबीता फोगटचा राजीनामा

5) COVID-19 : मॉडर्ना कंपनीने कोरोना लशीसंदर्भात घेतला मोठा निर्णय

6) प्रकाश आंबेडकर यांचे वादास निमंत्रण…

केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पंजाबचा संघ (Kings XI Punjab) गुणतालिकेत अतिंम स्थानी आहे. पंजाबनं 6 सामन्यात केवळ 1 सामना जिंकला आहे. तर 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबकडे सध्या केवळ 2 गुण आहेत. तर त्यांना नेट रन रेटही -0.431 आहे. त्यामुळे आता पंजाबला प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी सर्व सामने जास्त फरकाने जिंकावे लागतील. प्ले ऑफ गाठण्यासाठी संघांना 16 गुणांची गरज असते.


गुणतालिकेत नजर टाकल्यास 8 गुणांसह सध्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians)संघ पहिल्या क्रमांकावर आहे. तर, दिल्लीचेही 8 गुण आहेत. मात्र नेट रन रेटनं दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज दिल्लीचा मुकाबला राजस्थानशी आहे. त्यामुळे या सामन्यात दिल्लीला गुणतालिकेत अव्वल येण्याची संधी आहे. तर, 6 गुणांसह सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्या आणि कोलकाता नाइट रायडर्स चौथ्या क्रमांकावर आहेत. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचेही 6 गुण आहेत.

चेन्नई आणि राजस्थानला विजयाची गरज

चेन्नई (Chennai Super Kings) च्या टीमने आतापर्यंत त्यांनी खेळलेल्या प्रत्येक मोसमात प्ले-ऑफ गाठलं आहे. यंदा मात्र त्यांचा प्रवास खडतर सुरू आहे. चेन्नई (CSK) ने या मोसमात खेळलेल्या 6 पैकी 4 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे, तर त्यांना 2 मॅचच जिंकता आल्या आहेत. 16 गुण मिळवून प्ले-ऑफ गाठण्यासाठी चेन्नईला उरलेल्या 8 मॅचपैकी 6 मॅच जिंकाव्या लागतील. तर, राजस्थाननं 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यांनाही 8 पैकी 6 सामने जिंकणे गरजेचे आहेत.