यंदाच्या आयपीएल (IPL 2020) मधला सलग पाचवा पराभव टाळण्यासाठी पंजाब (KXIP) ची टीम मैदानात उतरत आहे. या मॅचमध्ये कोलकाता (kolkata knight riders) ने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.  कोलकात्याने या मॅचमध्ये शिवम मावीऐवजी प्रसिद्ध कृष्णाला संधी दिली आहे. शिवम मावी दुखापतीमुळे हा सामना खेळू शकत नसल्याचं केकेआरचा कर्णधार कार्तिकने सांगितलं, तर दुसरीकडे पंजाबचा फास्ट बॉलर शेल्डन कॉट्रेललाही दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी क्रिस जॉर्डनला टीममध्ये घेण्यात आलं आहे.

Must Read

पोस्टाच्या या योजनांमध्ये गुंतवणूक ठरेल फायद्याची

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पंजाबची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. पंजाबला 6 पैकी 1 मॅचमध्येच पंजाबला विजय मिळाला, तर 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. आयपीएलमधलं प्ले ऑफचं आव्हान कायम ठेवण्यासाठी आता त्यांना चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबची टीम शेवटच्या क्रमांकावर आहे. तर कोलकात्याने (kolkata knight riders)5 पैकी 3 सामने जिंकले असून 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. पॉईंट्स टेबलमध्ये केकेआर चौथ्या क्रमांकावर आहे.

केएल राहुल, मयंक अगरवाल, मनदीप सिंग, निकोलास पूरन, सिमरन सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मुजीब उर रहमान, क्रिस जॉर्डन, रवी बिष्णोई, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग

कोलकात्याची टीम

राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, नितीश राणा, सुनील नारायण, इयन मॉर्गन, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती