IPL 2020
IPL 2020आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबादचे संघ ( Sunrisers Hyderabad)आमनेसामने असतील. दोन्ही संघांची यंदाच्या मोसमातील कामगिरी खराब असून दोन्ही संघ आज विजयाच्या शोधात असतील. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या फलंदाजांची कामगिरी चांगली झाली आहे, पण गोलंदाजीमुळे संघ अडचणीत आहे. तर सामना जिंकण्यासाठी हैदराबादला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजता हा सामना सुरु होईल.

Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णयकिंग्ज इलेव्हन पॉईंट टेबलच्या तळाशी


यंदाच्या मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाबची (kings elven Punjab)कामगिरी आतापर्यंत अतिशय खराब आहे. सलामीवीर केएल राहुल जबरदस्त फॉर्ममध्ये असूनही पंजाबने आतापर्यंत 5 सामन्यांत फक्त एक सामना जिंकला आहे, तर 4 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाबची गोलंदाजी त्यांची सर्वात कमजोर बाजू आहे. पंजाबच्या गोलंदाजांनी आतापर्यंत निराश केलं आहे. दुसरीकडे फलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.


सनरायझर्स हैदराबादची निराशाजनक कामगिरी


सनरायझर्स हैदराबादबद्दल ( Sunrisers Hyderabadजर बोलायचे झाले तर यंदाच मोसम आतापर्यंत त्यांच्यासाठी खूप वाईट होता. हैदराबादने आतापर्यंत पाच सामने खेळले असून यामध्ये त्यांना 2 विजय मिळवत आले आहेत. तर 3 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबादला मागील दोन सामन्यात हार पत्करावी लागली आहे. जर हैदराबादला किंग्जविरुद्ध विजय मिळवायचा असेल तर विरोधी संघाच्या सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडणे गरजेचं आहे.