IPL 2020

IPL 2020-  इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामातील 60 सामन्यांपैकी 50 सामने खेळले गेले आहेत. साखळी फेरीतील एकूण 56 सामन्यांपैकी 50 सामने पूर्ण झाले आहेत. यांनतरही प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारा मुंबई इंडियन्स (mumbai indians) हा एकमेव संघ आहे. प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवणारे उर्वरित 3 संघ कोणते असेल याबाबत प्रत्येकालाच उत्सुकता आहे. या प्लेऑफमधील उर्वरित 3 जागांसाठी 6 संघात स्पर्धा आहे. त्यामुळे उर्वरित 6 सामन्यांमध्ये प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणाऱ्या 3 संघांची नावे निश्चित होईल. याचे समीकरण आपण या लेखात पाहाणार आहोत.


आयपीएलमधील 50 वा सामना शुक्रवारी (30 ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झाला. या सामन्यात राजस्थानने विजय मिळवला. त्यामुळे राजस्थानचे गुणतालिकेत 12 गुण झाले आहेत. याचा फायदा कोलकाता नाईट रायडर्स (12 गुण) आणि सनरायझर्स हैदराबाद (12 गुण) या संघांना होऊ शकतो. कारण आता पंजाब, हैदराबाद, कोलकाता आणि राजस्थान या तीनही संघांकडे जास्तीत जास्त 14 गुण मिळवण्याची संधी आहे. त्याचबरोबर प्लेऑफसाठी जाण्याचीही संधी आहे.

Must Read

1) अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार येस बँकेच्या ताब्यात

2) अल्पवयीन मुलीवर पुण्यात सामूहिक बलात्कार

3) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप

4) PHOTOS: 'मिर्झापूर 2' मधील डिप्पी खऱ्या आयुष्यात आहे भलतील ग्लॅमरस, See Pics

5) टवटवीत आणि चमकदार त्वचेसाठी नियमित करा फक्त 6 योगासनं


सामना क्रमांक -51: दिल्ली विरुद्ध मुंबई

मुंबई इंडियन्सचे  (mumbai indians) 16 आणि दिल्ली कॅपिटल्सचे 14 गुण आहेत. मुंबईचा संघ जिंकल्यास गुणतालिकेत अव्वल दोन संघात निश्चितच स्थान मिळवेल. दिल्ली जिंकल्यास प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. दिल्लीचा पराभव झाल्यास या संघांचे भाग्य त्याच्या होणाऱ्या पुढील सामन्यावर अवलंबून असेल.

सामना क्रमांक -52: बेंगलोर विरुद्ध हैदराबाद

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ हा सामना जिंकल्यास प्लेऑफमध्ये निश्चितच स्थान मिळवेल. जर त्यांचा पराभव झाला, तर त्यांचे भाग्य इतर सामन्यांवर अवलंबून असेल. हैदराबादसाठी उर्वरित दोन सामने करो अथवा मरोचेच असतील.

सामना क्रमांक -53: चेन्नई विरुद्ध पंजाब

चेन्नई सुपर किंग्जचा (chennai super kings) संघ प्लेऑफमधून बाद झाला आहे. परंतू हा संघ इतर संघाला प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर करू शकतो. जर पंजाब या सामन्यात पराभूत झाला, तर कोलकाता, राजस्थान आणि हैदराबादला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवायची संधी असेल. जर पंजाबने विजय मिळवला, तर कोलकातासह राजस्थान आणि हैदराबादलाही मोठा धक्का बसू शकतो.

सामना क्रमांक -54:: कोलकाता विरुद्ध राजस्थान

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषत: कोलकातासाठी. आयपीएलच्या 50 व्या सामन्यात पंजाबचा पराभव झाला आहे. त्यामुळे कोलकाता आणि राजस्थानचा सामना प्लेऑफच्या आधी सेमीफायनलसारखा होईल.

सामना क्रमांक -55: दिल्ली विरुद्ध बेंगलोर

दिल्ली आणि बेंगलोर या दोन्ही संघांचा हा 14 वा सामना असेल. म्हणजे शेवटचा साखळी सामना. त्याआधी त्यांना 13 वा सामना खेळायचा आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ गुणतालिकेत अव्वल 2 स्थानी निश्चितच राहील. पराभूत होणारा संघ कदाचित या शर्यतीतून बाहेर पडू शकतो.

सामना क्रमांक -56: मुंबई विरुद्ध हैदराबाद

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना आयपीएल 2020 चा अखेरचा साखळी सामना असेल. जर हैदराबादने याआधी होणाऱ्या सामन्यात विजय मिळवला आणि कोलकाता व पंजाब या दोन्ही संघांचा त्यांच्या उर्वरित सामन्यात पराभव झाला, तर हैदराबादसाठी हा महत्वपूर्ण सामना ठरणार आहे.