IPL 2020



आयपीएलमध्ये (IPL 2020) किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH vs KXIP) यांच्यात सामना झाला. हा सामना हैदराबादनं 69 धावांनी जिंकला. हैदराबादने ठेवलेल्या 202 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा 16.5 ओव्हरमध्ये 132 रनवर ऑल आऊट झाला. यासह पंजाब गुणतालिकेत अंतिम स्थानी पोहचला आहे. पंजाबनं सहापैकी केवळ एक सामना जिंकला  (Mujeeb Ur Rahman) आहे.


Must Read

1) मराठा संघटनांकडून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे

2) आता येतंय Green Ration Card

3) टीव्ही टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश; ‘रिपब्लिक’सह ३ चॅनल्सची चलाखी

4) क्रीडा विभागातून कुस्तीपटू बबीता फोगटचा राजीनामा

5) COVID-19 : मॉडर्ना कंपनीने कोरोना लशीसंदर्भात घेतला मोठा निर्णय

6) प्रकाश आंबेडकर यांचे वादास निमंत्रण…


पंजाबकडून निकोलास पूरनने 37 बॉलमध्ये 77 रनची वादळी खेळी केली. पण पंजाबच्या इतर कोणत्याही फलंदाजानं त्याला साथ दिली नाही. पंजाबचे शेवटचे तिन्ही फलंदाज शून्यावर बाद झाले. मात्र या सामन्यात 14व्या ओव्हरमध्ये एक विचित्र प्रकार घडला. खलील अहमद गोलंदाजी करत असताना पंजाबचा मुझीब रेहमानचा (Mujeeb Ur Rahman) झेल बेअरस्टोनं घेतला. मात्र अपील केल्यानंतर पंचांनी नाट आऊट असल्याचे सांगितले. यावर हैदराबादला DRS घेण्याची संधी होती, मात्र त्यांनी घेतला नाही.

अखेर पंचांनी थर्ड अम्पायरची मदत (SRH vs KXIP)  मागितली. यात मुझीबची बॅट चेंडूला लागत असल्याचे दिसत होते. त्यामुळे थर्ड अम्पायरनं मुझीबला बाद घोषित केले. मात्र मुझीब बाद झाल्यानंतर त्यानं निर्णय अमान्य असल्याचे सांगत थर्ड अम्पायरच्या निर्णयावरच DRS घेतला. त्यामुळे एका निर्णयासाठी दोन वेळा DRS घेण्यात आला.

मुझीनं DRS घेतल्यानंतर थर्ड अम्पायरनं अल्ट्रा एजमध्ये (ultra edge) बॅटचा संपर्क चेंडूशी झाला आहे की नाही हे पाहिले. यातही चेंडू आणि बॅट यांचा संपर्क झाल्याचे दिसून आले. त्यानंतर मुझीबला पुन्हा बाद घोषित करण्यात आले. मुझीबनं घेतलेल्या या निर्णयावर ट्विटरवर ट्रोल केले जात आहे.


केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पंजाबचा संघ गुणतालिकेत अंतिम स्थानी आहे. पंजाबनं 6 सामन्यात केवळ 1 सामना जिंकला आहे. तर 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबकडे सध्या केवळ 2 गुण आहेत. तर त्यांना नेट रन रेटही -0.431 आहे. त्यामुळे आता पंजाबला प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी सर्व सामने जास्त फरकाने जिंकावे लागतील. प्ले ऑफ गाठण्यासाठी संघांना 16 गुणांची गरज असते.