दुबईमध्ये पार पडत असणाऱ्या आयपीएल 2020 या क्रिकेटच्या महाकुंभामध्ये नुकताच मुंबई विरुद्ध बंगळुरू या संघांतील सामना पार पडला. ज्यामधील अनेक क्षणांची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. अशा या सामन्यादरम्यान hardik pandya  हार्दिक पांड्या आणि ख्रिस मॉरिस (Chris Morrisया दोन्ही खेळाडूंना खडे बोलही सुनावे लागले आहेत. 

Must Read 

1) सरकारने लागू केली आरोग्य विम्याची नवी योजना

2) IPL 2020 : बुमराहचा स्पेशल रेकॉर्ड

3) 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील शनायाने शेअर केला साडीतला फोटो

4) Gold Price Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा एकदा वधारलं सोनं,

5) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय़

6) युजवेंद्र चहलच्या होणाऱ्या पत्नीचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल....

बंगळुरूच्या संघातील खेळाडू ख्रिस मॉरिस आणि मुंबईच्या संघातील ऑलराऊंडर हार्दिक पांड्या यांच्यामध्ये सामन्यात खटका उडाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईच्या १९ व्या षटकादरम्यानचा हा प्रसंग. जेव्हा पांड्यानं मॉरिसन टाकलेल्या चेंडूवर षटकार लगावत त्याला अनुसरून इशारा केला. पाचव्याच चेंडूवर मॉरिसनं त्याला बाद करत पुन्हा एक इशारा केला. 

तो बाद होऊन परतत असताना मॉरिसनं काही इशारा केला, ज्यामुळं या दोन्ही खेळाडूंमध्ये ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं. हा सामना मुंबईच्या संघानं जिंकला असला तरीही या दोन खेळाडूंमध्ये झालेली ही इशाराबाजी अनेकांच्याच नजरेत आली.