ipl-2020-huge-setback-for-csk

 IPL कारकिर्दीत पहिलं शतक झळकावणाऱ्या शिखर धवन (Shikhar Dhawanने (१०१*) चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitalsला महत्वपूर्ण विजय मिळवून दिला. चेन्नईने विजयासाठी दिलेलं १८० धावांचं आव्हान दिल्लीने ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. अखेरच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १७ धावांची गरज होती. त्यावेळी नियमित गोलंदाज डॅरेन ब्राव्हो (Darren Bravoच्या जागी रविंद्र जाडेजाला गोलंदाजी देण्यात आली. जाडेजाच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने ३ षटकार लगावत दिल्लीला विजय मिळवून दिला. या पराभवासोबतच CSKला एक मोठा धक्का बसला.

Advertise

Must Read

1) कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आता सोशल मिडीयावर

2) राज्यपालांचा पॉलिटीकल एजंटसारखा वापर; राऊतांचा टोला

3) प्रत्येक स्त्रीमध्ये आहे 'दुर्गा'; लक्षवेधी रुपातील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

4) WhatsApp मध्ये समस्या आल्यास आता तक्रार थेट कंपनीकडे करा

5) न्यूडल्स तयार करता करता तरुणीनं केला भन्नाट डान्स, VIDEO पाहून व्हाल हैराण

सामन्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoniने शेवटच्या षटकाबाबत सांगितलं. ब्राव्हो दुखापतग्रस्त झाल्याने रविंद्र जाडेजाला षटक टाकावं लागलं असं तो म्हणाला. त्यानंतर प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने केलेल्या विधानामुळे CSKला जबर धक्का बसण्याची शक्यता आहे. “ब्राव्होच्या उजव्या पायाच्या दुखण्याने उचल खाल्ली आहे. दुखापत बऱ्यापैकी गंभीर आहे. त्यामुळे दुखापत वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कदाचित पुढील काही सामन्यांना बाव्होला मुकावे लागू शकतं. सध्याच्या त्याच्या दुखापतीचा अंदाज घेता त्याला तंदुरूस्त होण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागू शकतो”, असे फ्लेमिंगने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

असा रंगला सामना

फाफ डु प्लेसिस,(Faf du Plessis) अंबाती रायुडू आणि रविंद्र जाडेजा यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने १७९ धावांचा पल्ला गाठला. सलामीवीर सॅम करन स्वस्तात बाद झाला. यानंतर मैदानात आलेल्या शेन वॉटसन आणि डु प्लेसिस जोडीने महत्वपूर्ण भागीदारी केली. वॉटसन ३६ धावांवर बाद झाला पण डु प्लेसिसने ५८ धावा केल्या. या दोघांनंतर अंबाती रायडू (४५*) आणि जाडेजा (३३*) यांनी संघाला १७९ चा आकडा गाठून दिला.

१८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे झटपट बाद झाले. कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवनने ६८ धावांची भागीदारी केली. पण श्रेयस अय्यर आणि मार्कस स्टॉयनीस थोड्या धावा काढून बाद झाले. अलेक्स कॅरीही स्वस्तात बाद झाला. मग शिखरने आपलं पहिलं शतक झळकावत संघाला विजयासमीप नेलं. तर अक्षर पटेलने ५ चेंडूत २१ धावा करत संघाचा विजय साकारला.