Main Featured

मोठा दिलासा! करोना रुग्णसंख्येत २४ तासांत प्रचंड घट

corona today updates
India-   गेल्या काही महिन्यांपासून लाखांची दिवसागणिक लाखांच्या संख्येनं वाढत असलेल्या करोना (coronavirus)रुग्णांच्या संख्येत प्रचंड मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासांतील करोना रुग्णसंख्येची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केली असून, तब्बल एक ते दीड महिन्यानंतर रुग्णसंख्येची इतकी नीच्चांकी नोंद झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रुग्णसंख्येबरोबरच गेल्या २४ तासांत मृतांची संख्याही घटली (effect of corona)आहे.

Must Read

1) कोल्हापुरी! ऑनलाईन दुकानात आता घरबसल्या मिळणार अस्सल कोल्हापुरी चप्पल

2) महाविकासआघाडी सरकार हे बिघाडी सरकार आहे : हर्षवर्धन पाटील

3) प्रेग्नन्सीची न्यूज दिल्यानंतर अनिता हसनंदानी शेअर केले असे PHOTO

4) शुल्लक कारणावरुन रिक्षाचालकाला मारहाण; VIDEO

5) डोक्यात लोखंडी रॉडने वार करत पत्नीला संपवलं


देशात करोना विषाणूनं जनजीवन वेठीस धरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून करोनाचा संसर्ग वाढत असल्यानं केंद्र सरकारकडून लॉकडाउनची कडक अमलबजावणी करण्यात आली. लॉकडाउन शिथिल केला जात असतानाच्या काळात रुग्णसंख्येनं मोठी उसळी (effect of corona) घेतली होती. मात्र, आता रुग्णसंख्या घटताना दिसत आहे.

गेल्या २४ तासात देशात (India)५५ हजार ३४२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ७१ लाख ७५ हजार ८८१ वर पोहोचली आहे. यात ८ लाख ३८ हजार ७२९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तर ६२ लाख २७ हजार २९६ रुग्ण उपचाराच्या मदतीनं करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात आतापर्यंत १ लाख ९ हजार ८५६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

सोमवारीही (१२ ऑक्टोबर) करोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचं दिसून आलं होतं. सोमवारी देशात ६६ हजार ७३२ नवे रुग्ण आढळून आले होते. तर ८१६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. कालच्या तुलनेत आज आलेल्या आकडेवारीत मोठी तफावत आहे. विशेष म्हणजे खूप मोठ्या कालावधीनंतर इतकी प्रमाणात रुग्णांची नोंद झाली आहे.