करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा वेग जरी काहीसा मंदावला असला, तरी अद्यापही करोनाचे नवीन रुग्ण मोठ्या संख्येने वाढतच आहेत. शिवाय, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही भर पडतच आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात ७३ हजार २७२ नवे करोनाबाधित आढळले, तर

९२६ जणांना करोनामुळे जीव गमावावा लागला आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ६९ लाख ७९ हजार ४२४ वर पोहचली आहे.

Must Read

पोस्टाच्या या योजनांमध्ये गुंतवणूक ठरेल फायद्याची

देशभरातील एकूण ६९ लाख ७९ हजार ४२४ करोनाबाधितांच्या संख्येत ८ लाख ८३ हजार १८५ अॅक्टिव्ह केसेस, बरे झालेले व डिस्चार्ज मिळालेले ५९ लाख ८८ हजार ८२३ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १ लाख ७ हजार ४१६ जणांचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर निशाणा –

राज्य सहकारी बँकेच्या २५ हजार रुपयांच्या घोटाळा प्रकरणांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह हसन मुश्रीफ हे ही संशयित आरोपी होते. न्यायालयाने दोघांनाही निर्दोष ठरवले आहे. या निकालावरून त्यांनी माजी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. ‘चंद्रकांत पाटील हे तीन वर्ष सहकारमंत्री होते. त्यांना ना सहकार विभागातले काही कळले ना महसूल विभागातील. राज्य बँकेचा घोटाळा नेमका काय होता? हे पाटील यांना समजले नाही. सहकारमंत्री पद भूषविलेल्या पाटील यांनी सहकाराचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.