Main Featured

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी 1 वर्षे सश्रम कारावास


 

                                          

इचलकरंजी येथे महिलेचा विनयभंग  (Debauchery) केल्याप्रकरणी उमाकांत अशोक भिलुगडे (रा. शिवाजीनगर पोलिस स्टेशनसमोर) याला दोषी ठरवत येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एस. भंडारी यांनी विविध कलमान्वये 1 वर्षे सश्रम कारावास, 5 हजार रुपये दंड तसेच फिर्यादीस 10 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली.

Advertise

Must Read

तेजस्विनी पंडित फोटोशूट शेअर करत म्हणाली- "वाट पहाते मी गं...

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, इचलकरंजी शहरातील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात पिडीत महिला विमा विभागात काम करत होती. त्याठिकाणी उमाकांत भिलुगडे हा विमा एजंट म्हणून कामाच्या निमित्ताने येत होता. 16 एप्रिल 2018 रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादी या चांदणी चौक परिसरातून घरी परतत असताना आरोपीने फिर्यादीला थांबवून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल जे. ए. चिले यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यावर सुनावणी पूर्ण झाली सरकारी वकिल श्रीमती एम. डी.आवारीवार यांनी मांडलेला युक्तीवाद ग्राह्य मानत  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भंडारी यांनी भिलुगडे याला दोषी ठरवत भादंवि 354 अ अंतर्गत 1 वर्ष सश्रम कारावास, 5 हजार रुपये दंड, 354 ड अंतर्गत 1 वर्ष सश्रम कारावास, 5 हजार रुपये दंड आणि भादंवि 506 अंतर्गत 6 महिने साधी कैद व फिर्यादीला 10 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत.