Main Featured

इचलकरंजी सज्ज, जय्यत तयारी सुरुIchalkaranji- कोरोनातील (corona)प्रभावी कामगिरीनंतर आता पालिकेचा आरोग्य विभाग स्वच्छ सर्व्हेक्षणसाठी सज्ज झाला आहे. यंदा मानांकनात चांगली सुधारणा करण्यासाठी जय्यत तयारी सुरु (clean)झाली आहे. यामध्ये आता घनकचरा व्यवस्थापन व सांडपाण्यावरील प्रक्रियेवर अधिक भर दिला जाणार आहे. याद्वारे देशपातळीवर किमान 50 क्रमांकाच्या आत येण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 


केंद्र शासनाकडून (central government)दरवर्षी स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धा घेतली जाते. 1 ते 10 लाख लोकसंख्या विभागात इचलकरंजी शहराचा समावेश आहे. 2019 मध्ये शहराचा 107 वा क्रमांक आला होता. तर 2020 मध्ये मानांकनात सुधारणा होवून 89 वा क्रमांक आला होता. 

Must Read

तेजस्विनी पंडित फोटोशूट शेअर करत म्हणाली- "वाट पहाते मी गं...

यामध्ये काही उणिवा राहिल्या होत्या. त्यामुळे कमी गुण मिळाले होते. त्या दूर करण्याचे नियोजन यंदा पालिकेच्या आरोग्य विभागाकडून केले आहे. यामध्ये "ओडीएफ डबल प्लस' करणे व "जीएफसी' मध्ये तीन स्टार मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे देश पातळीवर किमान 50 क्रमांकाच्या आत येण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार (clean) आहे. 

शहर यापूर्वीच हागणदारीमुक्त (ओडीएफ प्लस) झाले आहे. आता त्यापुढील टप्पा यावर्षी पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील 70 सार्वजनिक शौचालयापैकी 25 टक्के शौचालयाच्या ठिकाणी चांगल्या सुविधा (उदा. वॉश बेनिस) देण्याबरोबरच सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यावर भर दिला जाणार आहे. गेल्यावेळी कचरा पडणाऱ्या ठिकाणांचे सौंदर्यीकरण (जीएफसी) करण्याबाबत गुण मिळाले नव्हते. त्यावर यंदा भर दिला जाणार आहे. अशी 25 ठिकाणे विकसीत केली जाणार आहेत. तसेच यामध्ये घनकचरा व्यवस्थापनाबाबत अधिक परिणामकारक काम करण्यात येणार आहे. यामध्ये थ्री स्टार मानांकन मिळविण्याचा यंदा मानस आहे. 

राजकीय इच्छशक्तीची गरज 

Ichalkaranji शहरात स्वच्छ सर्व्हेक्षणाबाबत राजकीय (politics) इच्छाशक्तीची गरज आहे. प्रशासन पातळीवर विविध उपक्रम राबवले जातात. त्याला राजकीय पाठबळ मिळण्याची गरज आहे. पण त्याबाबत उदासीन भूमिका पहावयास मिळते. याबाबत जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती निर्माण झाल्यास पहिल्या 10 क्रमांकात इचलकरंजी येवू शकते. 

कोरोनात कचरा कोंडावळे वाढले 

शहरात 2029 मध्ये 157 तर 2020 मध्ये 47 कचरा कोंडावळे होते. पण घंटागाडी सुरु केल्यानंतर कचरा कंटेनरमुक्त शहर केले होते. मात्र कोरोनात आरोग्य विभागाचे कर्मचारी अन्य कामांमध्ये व्यस्त राहिले. त्यामुळे शहरात पुन्हा उघड्यावर कचरा टाकण्याची ठिकाणे वाढली आहेत. ती पुन्हा बंद करण्यात येणार आहेत.