bihar election





bihar electionबिहार विधानसभेला काही कालावधी शिल्लक असला तरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे स्टार प्रचारक कन्हैया कुमार मैदानात उतरले आहेत. कन्हैया कुमार यांनी आपला गृहजिल्हा बेगूसराय येथून आपल्या निवडणूक अभियानाची सुरुवात केली आहे. या दरम्यान कन्हैया कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) जोरदार व्हायरल झाला आहे. 

यामध्ये त्यांनी भाजपावर (BJP) जोरदार निशाणा साधलेला पाहायला मिळत आहे. तसेच "मला सतत देशद्रोही म्हणत असाल, तर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करेन", असं कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे.

Must Read

1) कोल्हापुरी! ऑनलाईन दुकानात आता घरबसल्या मिळणार अस्सल कोल्हापुरी चप्पल

2) महाविकासआघाडी सरकार हे बिघाडी सरकार आहे : हर्षवर्धन पाटील

3) प्रेग्नन्सीची न्यूज दिल्यानंतर अनिता हसनंदानी शेअर केले असे PHOTO

4) शुल्लक कारणावरुन रिक्षाचालकाला मारहाण; VIDEO

5) डोक्यात लोखंडी रॉडने वार करत पत्नीला संपवलं


कन्हैया कुमार हे सोमवारी बगूसराय जिल्हयातील बखरी विधानसभा मतदारसंघातून सीपीआयचे उमेदवार सूर्यकांत पासवान आणि तेघडा येथील उमेदवार रामरतन सिंह यांचे नामांकन भरताना उपस्थित होते. (bihar election)

नामांकनानंतर कन्हैया कुमार यांनी आयोजित सभेत भाजपावर हल्लाबोल करत जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. पूर्वी ईव्हीएम हॅक होत होते, आता तर भाजपाचे लोक मुख्यमंत्र्यांनाच हॅक करत आहेत असं देखील कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे


"मला सतत देशद्रोही बोलाल, तर मी भाजपात प्रवेश करेन"


"ज्योतिरादित्य शिंदे हे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते अतिशय वाईट व्यक्ती होते. त्यांनी गंगेत डुबकी मारली तेव्हा पासून ते भाजपाचे झाले. मी एके ठिकाणी बोललो आहे की मला जर तुम्ही सतत देशद्रोही-देशद्रोही म्हणाल... तर मी बोलेन की खबरदार... जर जास्तच बोललात तर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करेन. ज्यांना हे शिव्या देतात ते 5 मिनिटानंतर काका म्हणायला सुरुवात करतात" असं कन्हैया कुमार यांनी म्हटलं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media)  खूप व्हायरल झाला आहे.


कन्हैया कुमार हे बिहारमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे स्टार प्रचारक


जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार हे बिहारमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. कन्हैया कुमार हे बेगूसरायेचच रहिवासी आहेत. यासोबतच ते सीपीआयच्या राष्ट्रीय कार्यसमितीचे सदस्य देखील आहेत. कन्हैया कुमार यांनी बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र भाजपाच्या गिरिराज सिंह यांनी त्यांचा पराभव केला होता. बिहार विधानसभा निवडणूक लढवायची नाही असं त्यांनी ठरवलं आहे. सीपीआयच्या उमेदवारांचा ते बिहारमध्ये प्रचार करणार आहेत.