Main Featured

वेळ आल्यास मराठा आरक्षणासाठी तलवारही काढेन

Sambhaji Raje

Maharashtra- वेळ मराठा आरक्षणासाठी (maratha reservation)तलावारीही काढू असा इशारा आता खासदार संभाजीराजेंनी दिला आहे. संयम कधी सोडायचा हे आम्हाला माहित आहे. गरज पडेल तेव्हा तलवारी काढू असं संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) म्हटलं आहे. आम्ही भीक नाही तर आमचा हक्क मागत आहोत. 

आम्हाला गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. येत्या १५ तारखेला अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. 

Must Read

1) मराठा संघटनांकडून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे

2) आता येतंय Green Ration Card

3) टीव्ही टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश; ‘रिपब्लिक’सह ३ चॅनल्सची चलाखी

4) क्रीडा विभागातून कुस्तीपटू बबीता फोगटचा राजीनामा

5) COVID-19 : मॉडर्ना कंपनीने कोरोना लशीसंदर्भात घेतला मोठा निर्णय

मराठा आरक्षणासह (maratha reservation) समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागं करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापूरमधून सुरुवात झाली. खासदार संभाजीराजे आणि खासदार ओमराजे निंबाळकर मोर्चात सहभागी झाले होते.

मराठा आरक्षण टिकवण्यासाठी ठाकरे सरकारचे प्रयत्न कमी पडत आहेत असं दिसून येतं आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयही नाही असाही आरोप संभाजी राजेंनी केला आहे. आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका. आम्ही दिल्लीला येण्यासाठीही घाबरणार नाही अशा शब्दात केंद्र सरकारने राज्य व केंद्र सरकारला आव्हान दिलं आहे. राज्यात होणारी आंदोलनं ही भाजपा (BJP)पुरस्कृत नाहीत असंही संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.

१९०२ मध्ये शाहू मराजाांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं. त्यात मराठा समाजाचाही समावेश होता. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची स्वराज्याची संकल्पना पुन्हा एकदा प्रस्थापित होणे आवश्यक आहे. ८० टक्के मराठा समाज गरी आहे. मात्र आम्ही भीक मागत नाही हक्काचे आरक्षण मागतो आहोत. आम्हाला आता गृहीत धरु नका आणि कायदा हातात घ्यायची वेळ आमच्यावर आणू नका. माझ्या रक्तात शिवाजी महाराज आणि शाहू मराज आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार असंही संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं.