i-am-bold-beautiful

politics
- अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या आणि दशकभराची राजकीय कारकिर्द असलेल्या खुशबू सुंदर यांनी काल काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. द्रमुक, काँग्रेस आणि भाजपा असा त्यांचा प्रवास राहिला आहे.


मी अजून पंतप्रधान नरेंद्र मोदींना (pm narednra modi)भेटलेली नाही. पण फेब्रुवारी महिन्यापासून माझ्या मनात काँग्रेस सोडण्याचा विचार सुरु झाला होता. एका विषयावर मी पत्रकार परिषद घ्यावी, असे पक्षाचे मत होते. पण चेन्नईतील पक्ष मुख्यालयात मला पत्रकार परिषदेसाठी परवानगी नाकारण्यात आली. नाराजीची अशी काही कारणे होती, असे खुशबू यांनी सांगितले.

Must Read

1) कोल्हापुरी! ऑनलाईन दुकानात आता घरबसल्या मिळणार अस्सल कोल्हापुरी चप्पल

2) महाविकासआघाडी सरकार हे बिघाडी सरकार आहे : हर्षवर्धन पाटील

3) प्रेग्नन्सीची न्यूज दिल्यानंतर अनिता हसनंदानी शेअर केले असे PHOTO

4) शुल्लक कारणावरुन रिक्षाचालकाला मारहाण; VIDEO

5) डोक्यात लोखंडी रॉडने वार करत पत्नीला संपवलं

मी काँग्रेस का सोडली? त्या विषयावर जास्त खोलात जायचे नाही. पक्षाचा कारभार ज्या पद्धतीने सुरु होता, ते मला पसंत नव्हते, म्हणून मी पक्ष सोडला. काँग्रेस पक्ष आणि त्यांचे लोक बदलले आहेत असे खुशबू सुंदर म्हणाल्या.

देशासाठी काम करणं आणि लोकांची सेवा करणं ही माझी विचारधारा आहे. मी संधीसाधू आहे, असं लोक म्हणतात. पण कुठल्याही पदाची मी मागणी केलेली नाही असे खुशबू म्हणाल्या.

धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर मी माझी भूमिका बदललेली नाही. पक्षाबद्दलच्या माझ्या दृष्टीकोनात बदल झाल्यामुळे मी भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेसने मुस्लिमांचा मुद्दा उपस्थित केला म्हणून ते हिंदू विरोधी आहेत का? तेच भाजपाला लागू पडते असे खुशबू सुंदर म्हणाल्या.

मोदी सरकारवर टीका केली, हे मी नाकारणार नाही. मी स्वत: अनेक टि्वट केली. काँग्रेसमध्ये असताना मी तिहेरी तलाक कायद्याचे समर्थन केल्यानंतर समस्या निर्माण झाली. पण म्हणून मी विरोधासाठी विरोध केला नाही. फक्त विरोध न करता, समस्येवर तोडगा काढणे हे विरोधी पक्षांचे कर्तव्य (politics)आहे असे खुशबू म्हणाल्या.

सहा ऑक्टोबरच्या आंदोलनात मोदींवर टीका केली होती, पाच दिवसात असं काय बदललं? या प्रश्नावर खुशबू यांनी उत्तर दिले. काही बदललं नाही. पण पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणं, हायकमांडच्या निर्देशाचं पालन करणं बंधनकारक होतं. पण आता डोक्यावरुन पाणी गेलंय, पक्ष आणि जनता यामध्ये इतकं अंतर का पडलं आहे? याचं काँग्रेसने आत्मपरिक्षण केलं पाहिजे असे खुशबू म्हणाल्या.

असुरक्षित शरीरसंबंध, धार्मिक विषयांवर तुम्ही तुमची मते मांडली आहेत, तुम्ही आजही तुमच्या मतांवर ठाम आहात का? यावर खुशबू म्हणाल्या कि, "मी कधीही माझी भूमिका बदललेली नाही. मला पक्षात घेण्याआधी भाजपानेच २० हजारवेळा विचार केला असेल"

मी चिखलफेकीच्या राजकारणात (politics)जाणार नाही, तो माझा उद्देश नाही. करुणानिधींबद्दल मला आदर आहे. मी पक्ष का सोडला? ते त्यांना माहित आहे. पण मी ते कारण सार्वजनिक करणार नाही. दम्रुक आणि काँग्रेसमध्ये आजही माझे चांगले मित्र आहेत.