sunrisers hyderabad
sports news-
इंडियन प्रीमियर लीग 2020 (IPL 2020) मधील 52 वा सामना सनरायझर्स हैदराबाद (sunrisers hyderabad)आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात होईल. प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी हैदराबादला या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. याआधी या संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे संघातून बाहेर गेला होता. त्यामुळे संघात योग्य संतुलन राखने अवघड झाले होते. यातच हैदराबादच्या अडचणींमध्ये पुन्हा भर पडली आहे. त्यांचा आणखीन एक खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर गेला आहे.

Must Read

1) अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार येस बँकेच्या ताब्यात

2) अल्पवयीन मुलीवर पुण्यात सामूहिक बलात्कार

3) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप

4) PHOTOS: 'मिर्झापूर 2' मधील डिप्पी खऱ्या आयुष्यात आहे भलतील ग्लॅमरस, See Pics

5) टवटवीत आणि चमकदार त्वचेसाठी नियमित करा फक्त 6 योगासनं

विजय शंकरला झाली होती दुखापत

अष्टपैलू विजय शंकर हैदराबाद संघाचा (sunrisers hyderabad) एक महत्वाचा खेळाडू आहे. मागील काही सामन्यात केवळ गोलंदाजीतच नाही, तर फलंदाजीतही त्याने महत्वाची कामगिरी बजावली आहे. परंतु दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या मागील सामन्यात गोलंदाजी करताना त्याला हार्मस्ट्रिंगची दुखापत झाली. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला होता. मात्र, तो अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे त्याला उर्वरित आयपीएलमधून  (IPL 2020) बाहेर जावे लागले आहे. (sports news)

वृद्धीमान साहा झाला होता जखमी

मागील सामन्यात अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धीमान साहा सलामीला आला होता. त्याने 87 धावांची दमदार खेळी केली होती. मात्र दुखापतीमुळे तो देखील दुसऱ्या डावात मैदानात आला नव्हता. जर तो दुखापतीतून सावरला नसेल, तर जॉनी बेयरस्टोला संघात स्थान द्यावे लागेल. अशा परिस्थितीत संघांचे संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. कारण जॉनी बेयरस्टो संघात आल्यामुळे अष्टपैलू जेसन होल्डरला संधी मिळणार नाही