Main Featured

'या' बँकेकडून होम लोनवरील व्याज दरात मोठी कपात
तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला जर स्वस्तातलं गृह कर्ज हवं असेल तर थोडं थांबा. आता कोटक महिंद्रा या खासगी बँकेने होम लोनच्या (home loan)व्याजावर मोठी कपात केली आहे. कोटक महिंद्रा बँकेने 7 टक्क्याने होम लोन देण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोटक महिंद्राचा हा होम लोन दर भारतीय स्टेट बँकेच्या होम लोन दरा (interest rate)एवढाच झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Must Read

1) उद्योग क्षेत्रातील कामगारांना वेतनवाढ मिळण्याची शक्यता

2) आमिर खानच्या मुलीने दिली इन्स्टाग्रामवर धमकी...

3) अ‍ॅमेझॉन अन् फ्लिपकार्टला मनसेचा इशारा

4) लग्नाचं आमिष दाखवून रेपचा आरोप; मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलासह पत्नीवर गुन्हा

5) मंत्रालय, स्वारगेट, कोल्हापूर, अलिबागसाठी ५० शिवशाही

6) 'वर्क फ्रॉम होम'मुळे सायबर गुन्ह्यात मोठी वाढ


कोटक महिंद्रा बँकेने ग्राहकांसाठी 'खुशी का सीजन' नावाची खास ऑफर सुरू केली आहे. ही ऑफर एक महिन्यापर्यंत चालेल. दुसऱ्या बँकेतील कर्ज बंद करून कोटक महिंद्रामध्ये हे कर्ज वर्ग करणाऱ्या ग्राहकांनी बॅलन्स ट्रान्सफर केल्यास त्यांची 20 लाख रुपयांपर्यंतची बचत होईल, असं या बँकेने म्हटलं आहे. या नव्या योजनेनुसार बँकेने ग्राहकांना कर्ज देण्यापासून ते शॉपिंग करण्यापर्यंतच्या गोष्टीवर ऑफर देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या बँकेची क्रेडिट ग्रोथ गेल्या अनेक वर्षांपासून 6 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

एसबीआयमध्ये 30 लाखांपेक्षा कमी गृह कर्जाचे (home loan) व्याज 7 टक्के असून महिलांना व्याज दरात 0.5 टक्क्यांनी सवलत दिली जात आहे. या शिवाय कोटक महिंद्रा बँकेकडून कार लोन, टू व्हिलर लोन, कृषी कर्जाशी संबंधित व्यवसाय तसेच कमर्शियल इक्विपमेंटच्या फायनान्सवरील प्रोसेसिंग फीवरही सूट दिली जात आहे. त्याशिवाय या बँकेत नवीन बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकाला 250 रुपयांचं व्हाऊचरही दिलं जात असून या व्हाऊचरवरून अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून खरेदी केली जाऊ शकते.