sangli rainfall

मिरज पूर्वसह जिल्ह्यातील (sangli) शेतीवर जणू आभाळ फाटले आहे. टोमॅटो, ढोबळी मिरची, द्राक्षे इतर फळभाज्या आणि पालेभाज्या यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना (farmer)सोसावे लागणार आहे. सर्वच पिके घेणारा शेतकरी या पावसाने अक्षरशः रडकुंडीला आला आहे.

ढोबळी मिरची व टोमॅटोने शेतकऱ्यांना (farmer) लॉकडाऊनमध्ये तारले होते. अशात देशभरात व मेट्रो सिटीतील हॉटेल व्यवसाय 5 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आल्याने अचानक  ढोबळी मिरचीसह सर्वच फळभाज्या यांचे दर वाढू लागले होते. ढोबळी मिरचीचे दर 32 रुपये किलो वरून 51 व 61 रुपये किलो पर्यंत वधारले होते. तर टोमॅटो 25 ते 30 रुपये किलो दरम्यान स्थिर आहे. 

Must Read

कोरोनाग्रस्त क्रिस्टियानो रोनाल्डोने तोडला 'नियम'


मात्र दर चांगले आहेत, उत्पादन मोठ्या प्रमाणावर निघत असताना अचानक वातावरण बदलून कमी दाबाचा पट्टा तयार होऊन आलेल्या वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातले. आणि ढोबळी मिरची व टोमॅटोच्या फडात व प्लॉटमध्ये पाणी उभे राहून कुजवा रोग येऊन प्लॉट वाया जाऊ लागले आहेत. पुढच्या दोन दिवसांमध्ये नुकसानीचे नेमके स्वरूप पुढे येणार आहे.

ढोबळी मिरचीचे एकरी किमान आठ ते दहा लाख रुपये मिळकत मिळण्याची शक्यता निर्माण झाली असताना, शेतकऱ्यांच्या हाता तोंडाचा घास या पावसाने हिरावला आहे. सर्व भाजीपाला पिकात कुजवा रोग सुरू होऊन प्लॉट फेल जाऊ लागले आहेत. तर द्राक्षबागांमध्ये फुलोऱ्यात घळ होऊन तर पोंगा स्टेजमध्ये करपा भुरी दावण्या असे रोग येऊन बागाही हातातून निघून जाऊ लागल्या आहेत.

एकंदर पावसाने सर्वच पिकांना फटका बसला असून, विशेषतः व्यापारी पिके घेतलेल्या रानात एकरी पाच ते दहा लाख रुपये तोटा लक्षात घेता मिरज पूर्व आणि जिल्ह्यातील दुष्काळी भागातील या पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना (farmer) अंगावर घ्यावे लागत आहे. या परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे भरून येऊ न शकणारे अपरिमीत नुकसान झाले आहे.