Main Featured

पावसाने सांगली जिल्ह्यातील १२३ गावांना फटका, ९ जणांचा मृत्यू


  
                                      
  


गेल्या आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीचा सांगली जिल्ह्यात १२३ गावांना फटका बसला. यात ८४० घरांची पडझड झाली असून, ९ जणांचा मृत्यू झाला. पूर आणि विजा पडून २८ जनावरे दगावली आहेत.८२७६ हेक्‍टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याने पंचनामे सुरू केले आहेत, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील (Guardian Minister Jayant Patilयांनी दिली. मंत्री पाटील यांनी शनिवारी पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला.

Advertise

Must Read

1) कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आता सोशल मिडीयावर

2) राज्यपालांचा पॉलिटीकल एजंटसारखा वापर; राऊतांचा टोला

3) प्रत्येक स्त्रीमध्ये आहे 'दुर्गा'; लक्षवेधी रुपातील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

4) WhatsApp मध्ये समस्या आल्यास आता तक्रार थेट कंपनीकडे करा

5) न्यूडल्स तयार करता करता तरुणीनं केला भन्नाट डान्स, VIDEO पाहून व्हाल हैराण

जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून प्रस्ताव सादर करावेत. कोणीही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, 'अतिवृष्टीमुळे काही घरांची अंशत: अथवा पूर्णत: पडझड झाली आहे. त्यांचे पंचनामेही तात्काळ करावेत. मयत व्यक्ती व मृत जनावरे याबाबत मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. 

सामान्य वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खचलेले रस्ते, पूल याबाबत लहान स्वरूपाची कामे आहेत त्याची तात्काळ दुरूस्ती सुरू करावी. विमा कंपन्यानी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शेतकऱ्यांना मदत करावी. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, आदी उपस्थित होते.