kolhapur
kolhapur  शहर  आणि  परिसरात  बुधवारी  रात्री  मुसळधार  पाऊस  झाला. रात्री  साडेनऊच्या सुमारास वाढलेला पावसाचा जोर (heavy rainfall)उशिरापर्यंत कायम होता. या पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. दरम्यान, पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने त्यावरील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. राजाराम बंधाऱ्यासह सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Must Read

कोरोनाग्रस्त क्रिस्टियानो रोनाल्डोने तोडला 'नियम'


kolhapur शहरात  बुधवारी सकाळपासूनच  पावसाची संततधार सुरू होती. दुपारी दोन ते तीन या वेळेत मुसळधार पाऊस (heavy rainfall) झाला.  यानंतर  पावसाचा  जोर  कमी  झाला.  गुरुवार सकाळपर्यंत  पावसाची  रिपरिप  सुरू होती. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. हा जोर इतका होता  की  काही  अंतरावरीलही  काही  दिसत नव्हते. 

सुमारे तासभर धुवाँधार पाऊस सुरू होता. या पावसाने जयंती नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाचाही वेग काहीसा वाढला होता. या  पावसाने  रस्त्यावरील  वर्दळ  काही  काळ  कमी  झाली.  दुकाने  बंद  करून  तसेच   कामावरून घराकडे जाणार्‍यांचे हाल झाले.    

मोठ्या पावसाने अनेकांना जागा मिळेल तिथे थांबावे लागले. यामुळे बसथांबे, दुकाने, टपर्‍या आदी ठिकाणी नागरिकांची गर्दी होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर तर काहींनी भिजतच घर गाठणे पसंत केले. जोरदार पावसाने रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. 

ताराराणी  चौक,  दाभोळकर  कॉर्नर,  व्हिनस  कॉर्नर,  सीपीआर  चौक  आदी  परिसरात  रस्त्यावर पाणी साचले. परीख पुलाखाली वेगाने पाणी साचत गेले. अर्धा  तासात  पुलाखाली  सुमारे  पाऊण ते फुटभर पाणी   साचले. काही  काळ  त्यातूनच  वाहनांची  ये-जा  सुरू  होती.  मात्र,  पाणी  आणखी  वाढल्यानंतर या पुलाखालील वाहतूक काही  काळासाठी  बंद  झाली. पर्यायी  मार्गाने वाहने नेण्यात येत होती. उशिरा पाणी ओसरल्यानंतर पुलाखालील वाहतूक पूर्ववत झाली.