Main Featured

पावसाने "नको रे बाबा" असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांवर आणली आहे
कोरोनाचे संकट (corona)असतानाच आता पावसाने "नको रे बाबा" असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांवर आली आहे. शनिवार (ता. 9 ) रोजी सुरू झालेल्या परतीच्या पावसाच्या तडाख्यानतंर तीन दिवस रोजच दमदार पाऊस हजेरी लावत असल्याने परिसरात तसेच शेतीमध्ये (farmer)सगळीकडे पाणी पाणी झाले आहे.

Must Read

तेजस्विनी पंडित फोटोशूट शेअर करत म्हणाली- "वाट पहाते मी गं...

असे असतानाच आज आज बुधवार (ता.14 ) रोजी सकाळपासूनच परिसरात संततधार पावसाने नॉन स्टॉप बरसात सुरू केली आहे.अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम म्हणून हा पाऊस होत असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.आता मात्र हा पाऊस नको रे बाबा ! ! असे म्हणण्याची वेळ मात्र निश्चितच आली आहे.

शेतकरी हबकला

गेल्या चार दिवसापासून परतीच्या मोठया दमदार पावसानतंर आता संततधार पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे भाजीपाला पिके तसेच फळबागा पाण्यात गेले आहेत,ओढणी साडीला ऊस ठिकाणी लोळण घेतली आहे.

तर आता आगामी पिके कोणती घ्यायची हे संकट शेतकर्‍यांपुढे आले आहे गेल्या चार दिवसापासून पावसामुळे शेती कामे ठप्प झाली असल्याने शेतमजूर मात्र घरीच बसून असल्याने त्यांच्यापुढे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तर परिसरात दाखल होत असलेल्या ऊसतोड मजुरांचीही मोठी पंचाईत झाली आहे.

संपूर्ण उसाच्या शेतात (farmer) पाणी साचल्याने आणखी पंधरा वीस दिवस तरी शेतीचा वाफसा झालेशिवाय ऊसतोड सुरू होणार नाही त्यामुळे आता खायचे काय ? हा प्रश्न या ऊसतोड मजूरापुढे पडला आहे. रोज येणाऱ्या पावसामुळे हवेत मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात गारठा निर्माण झाला आहे तसेच सूर्यदर्शनही होत नसल्याने रोगट वातावरण तयार झाली आहे. पावसामुळे नागरिक घराबाहेर पडत नसल्याने व्यापारही ठप्प झाला आहे दुकानदार  ग्राहकांची वाट पाहत दुकानात बसले आहेत.