great-indian-festival-sale-6-pm

अ‍ॅमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart) वर सध्या फेस्टिव्हल सेल सुरु आहे. काही वस्तू अशा आहेत की त्या अत्यंत कमी किंमतीत विकल्या जात आहेत. अशीच एक ऑफर अ‍ॅमेझॉनवर (Amazon) आहे. स्पीकरच्या किंमतीत स्मार्ट टीव्ही. महत्वाचे म्हणजे ही ऑफर आज सायंकाळी 6 वाजता सुरु होणार आहे. केवळ 3232 रुपयांत 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही विकला जाणार आहे. (Great Indian Festival)

भारतीय टीव्ही ब्रँड Shinco ने या खास सेलची घोषणा केली आहे. यानुसार कंपनीचा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही केवळ 3232 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. या टीव्हीचा मॉडेल नंबर  SO328AS आहे. या टीव्हीचा फ्लॅश सेल 18 ऑक्टोबर म्हणजे आज सायंकाळी 6 वाजता अ‍ॅमेझॉनवर होणार आहे. स्टॉक असे पर्यंत हा 32 इंची टीव्ही खरेदी करता येणार आहे. 

Must Read

1) कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आता सोशल मिडीयावर

2) राज्यपालांचा पॉलिटीकल एजंटसारखा वापर; राऊतांचा टोला

3) प्रत्येक स्त्रीमध्ये आहे 'दुर्गा'; लक्षवेधी रुपातील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

4) WhatsApp मध्ये समस्या आल्यास आता तक्रार थेट कंपनीकडे करा

5) न्यूडल्स तयार करता करता तरुणीनं केला भन्नाट डान्स, VIDEO पाहून व्हाल हैराण

Shinco च्या या 32 इंची स्मार्ट टीव्हीमध्ये अँड्रॉईड 8 आहे. यामुळे यावर प्लेस्टोअरवरील सर्व अ‍ॅप चालणार आहेत. तसेच या टीव्हीमध्ये A+ ग्रेड पॅनेल, HRDP डिस्प्ले टेक्नोलॉजी, 1 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. या टीव्हीमध्ये 20 वॉटचा स्पीकर आणि ब्ल्यूटूथ देखील देण्यात आलेले आहे. यामध्ये 3 HDMI आणि 2 USB पोर्टसोबत A-53 क्वॉडकोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. 


अँड्रॉईड बेस असल्याने UNIWALL-UI सोबत Disney+Hotstar, Zee5, Sony Liv, Voot ,Sun NXT, Jio Cinema, Eros Now, Hungama Play, Alt Balaji, Movie Box, Bloomberg Quint, The Quint, HomeVeda, Epic On, Docubay सारखे ओटीटी अ‍ॅप पाहता येणार आहेत. म्हणजेच जवळपास सारेच मनोरंजनाचे कार्यक्रम दिसणार आहेत. 

नवीन ऑफर घेऊन आलेल्या शिंको इंडियाचे संस्थापक अर्जुन बजाज यांनी सांगितले की, आम्ही गेल्या वर्षी पहिल्या वर्षपूर्तीवेळी 5555 रुपयांत 55 इंचाचा स्मार्टटीव्ही अॅमेझॉनच्या सेलमध्ये विकला होता. यंदा दुसरा वर्धापन दिन असून यानिमित्ताने 32 इंचाचा टीव्ही 3232 रुपयांत उपलब्ध करत आहोत. 

अ‍ॅपल आयफोनवर डिस्काऊंट

फ्लिपकार्टने (Flipkart) प्लस मेंबर्ससाठी आदल्या दिवशीच बिग बिलिअन डेज (Big Billion Days) सेल सुरु केला होता. अ‍ॅमेझॉननेही ग्रेट इंडियन फेस्टिव्हल (Great Indian Festival) सेल सुरु केला आहे. अ‍ॅमेझॉनवर 17 ऑक्टोबरपासून सेल सुरु झाला. मंगळवारी रात्री अ‍ॅपलने आयफोन १२ लाँच केला आहे. यानिमित्ताने या सेलमध्ये आयफोनवर मोठ्या ऑफर सुरु झाल्या आहेत. सणासुदीच्या काळात दोन ई-कॉमर्स कंपन्या मोठे सेल आणत आहेत.