online learning
संपूर्ण देश सध्या कोरोनाव्हायरस (Coronavirus Pandemic) या साथीच्या रोगाशी दोनहात करत आहेत. दरम्यान मार्चपासून कोरोनामुळे शाळा-महाविद्यालय बंद होती, लवकरच त्यांना परवानगी दिली जाणार आहे. मार्चपासून ऑनलाईन वर्ग घेतले जात आहे. यातच सोशल मीडियावर सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे, यामध्ये केंद्र सरकार (central government)ऑनलाईन अभ्यासासाठी देशभरातील विद्यार्थ्यांना 10 जीबी इंटरनेट डेटा (Internet data) मोफत देणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र हा मेसेज फेक असल्याचे समोर आले आहे.


Must Read

1) आमदारानं 19 वर्षांच्या मुलीशी केलं लग्न

2) मराठमोळी नेहा पेंडसे एथनिक ड्रेसमध्ये दिसते झक्कास..! Photos

3) राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड

4) शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपा नेत्याला अटक

5) Video: १०३ वर्षीय आजोबांनी १४ हजार फुटांवरुन मारली उडली

या व्हायरल मेसेजमध्ये असे लिहिले आहे की, कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद झाली आहेत आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे, म्हणून सरकार सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य इंटरनेट (दररोज 10 GB ) देत आहे. विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण करावे आणि इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षा घेता यावी यासाठी हे सरकार करत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या मेसेजमध्ये एक लिंक देखील देण्यात आली आहे आणि असे म्हटले आहे की या लिंकवरून तुम्ही विनामूल्य इंटरनेट पॅक (Internet data) (दररोज 10 जीबी) मिळविण्यासाठी फॉर्म भरू शकता.
या व्हायरल मेसेजमध्ये असेही लिहिले आहे की लोकांच्या सोयीसाठी हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मात्र पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये हा मेसेज फेक असल्याचे समोर आले आहे. असा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही आहे.

यापूर्वीही सोशल मीडियावर (social media)एक बातमी व्हायरल होत होती, ज्यामध्ये असा दावा केला जात होता की सरकार ऑनलाईन अभ्यासासाठी देशभरातील विद्यार्थ्यांना मोफत स्मार्टफोन वाटप करीत आहे.