Main Featured

SBI 45 कोटी खातेधारकांना खूशखबर

SBI
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या भारतीय स्टेट बँकेने (SBI) खातेधारकांना खूशखबर दिली आहे. बँकेने शहरी आणि ग्रामीण भागातील खातेधारकांच्या महिन्याच्या सरासरी किमान शिल्लक रकमेच्या मर्यादेत (मिनिमम बॅलेन्स) (minimum balance)घट केली आहे.

Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय


खात्यामध्ये दर महिन्याला सरासरी कमीत कमी काही रक्कम असणे गरजेचे असते. त्याला मिनिमम बॅलेन्स म्हणतात. खात्यात तेवढी रक्कम नसल्यास खातेधारकाला दंड भरावा लागतो. बँकेने या मिनिमम बॅलेन्सच्या मर्यादेत घेट केली आहे. तसेच खात्यात मिनिमम बॅलेन्स नसल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडातही घट केली आहे. बॅकेच्या या निर्णयाने खातेधारकांना दिलासा मिळाला आहे.

SBI बँकेच्या या निर्णयाचा फायदा 45 कोटी खातेधारकांना होणार आहे. आता शहरी भागातील खातेधारकांना महिन्याला 3000 रुपयांचा मिनिमम बॅलेन्स खात्यात ठेवावा लागणार आहे. तर ग्रामीण भागात ही मर्यादा 1000 रुपये करण्यात आली आहे. 


तसेच खात्यात मिनिमम बॅलेन्स नसल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेतही घट करण्यात आली आहे. खात्यात मिनिमम बॅलेन्स नसल्यास 5 ते 15 रुपयांचा दंड आणि जीएसटी आकारण्यात येणार आहे. एसबीआयने एप्रिल 2017 मध्ये मिनिमम एव्हरेज बॅलन्सचे दंड लागू केले होते. आता त्यात घट करण्यात आली आहे.


खात्यामध्ये (Account)किमान सरासरी शिल्लक मिनिमम बॅलेन्स 50 टक्क्यांपर्यंत कमी असल्यास 10 रुपये दंड आणि जीएसटी आकारण्यात येणार आहे. तर मिनिमम बॅलेन्स 50 ते 75 टक्क्यांपर्यंत कमी असल्यास 12 रुपये दंड आणि जीएसटी लागणार आहे. तर मिनिमम बॅलेन्स 75 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास 15 रुपये दंड आणि जीएसटी आकारण्यात येणार आहे. बँकेकडून मिनिमम बॅलेन्सची मर्यादा आणि त्यावरील दंडात घट करण्यात आल्याने खातेधारकांना दिलासा मिळाला आहे.