KolhapurKolhapur जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची  (corona) संख्या घटत चालली असल्याने कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे. रुग्ण कमी होत असल्याने 52 कोविड सेंटरपैकी 10 कोविड सेंटर बंद करण्यात आली आहेत, तर उर्वरित सेंटरमधील जवळपास 90 टक्‍के बेड रिकामे आहेत, तर दररोजच्या चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. 

त्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही कमी होत आहे. कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी तर मोठ्या फरकाने वाढला आहे. कोरोनाचा कहर कमी होत असून, नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे, मात्र पुढील काही महिने सतर्क राहून काळजी घ्यावी लागणार आहे. 

Must Read

1) कोल्हापुरी! ऑनलाईन दुकानात आता घरबसल्या मिळणार अस्सल कोल्हापुरी चप्पल

2) महाविकासआघाडी सरकार हे बिघाडी सरकार आहे : हर्षवर्धन पाटील

3) प्रेग्नन्सीची न्यूज दिल्यानंतर अनिता हसनंदानी शेअर केले असे PHOTO

4) शुल्लक कारणावरुन रिक्षाचालकाला मारहाण; VIDEO

5) डोक्यात लोखंडी रॉडने वार करत पत्नीला संपवलं


मार्च महिन्यात आलेल्या कोरोनाचा (corona) कहर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात खूप वाढला. दररोज पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे 20 पासून 69 टक्‍क्‍यापर्यंत पोहोचले. रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड सेंटरही वाढवण्यात आले. एकवेळ तर रुग्णांना बेड मिळत नसल्याने आपले प्राण गमवावे लागले, मात्र कोरोनाची ही लाट आता कमी आली आहे. दररोज बाधित रुग्णांची संख्या कमी-कमी होत चालली आहे. पुढील महिना भरात दररोज सापडणारे कोरोनाचे रुग्ण हे नगण्य असतील, असा विश्‍वास आरोग्य विभागाने व्यक्‍त केला आहे. 

167 दिवसांनी रुग्ण दुप्पट 

Kolhapur जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर या काळात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले. 6 दिवसांनी, 8 दिवसांनी कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली. या काळात दिवसाला कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 60 टक्‍के होते; मात्र कोरोनाचा कहर कमी होत असून, रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण 167 दिवसांवर गेले आहे, तर पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 55 ते 60 टक्‍क्‍यांवरून 8 टक्‍के इतके खाली आले आहे. त्यामुळे 167 दिवसांनी दुसरी लाट येणार नाही, यासाठी सर्वांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे. 

5 सप्टेंबर रोजी सर्वाधिक बाधित 

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात दररोज तीन अंकी संख्येने रुग्ण पॉझिटिव्ह येत होते, तर काही वेळा ही संख्या चार अंकी झाली. जिल्ह्यात आतापर्यंत एकाच दिवशी सर्वाधिक बाधित रुग्ण हे 5 सप्टेंबर या दिवशी आढळले. या दिवशी 2521 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील 69.65 टक्‍के म्हणजेच 1756 लोक पॉझिटिव्ह आढळले. चाचणीच्या तुलनेत एकाच दिवसात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे हे सर्वाधिक प्रमाण होते. 

कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याने भीतीचे कारण नाही, मात्र खबरदारी आवश्‍यक आहे. पुढील महिन्यात हवामान बदल होणार असून, हिवाळा सुरू होत आहे. थंडीमुळे सर्दी, खोकला, छाती भरणे असा त्रास होतो. त्यामुळे लगेच घाबरून जाण्याचे कारण नाही. योग्य ते उपचार घेणे, घरातील वयस्कर लोकांची काळजी घेणे व त्रास जाणवल्यास वैद्यकीय यंत्रणेकडे जाणे आवश्‍यक आहे. डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर या काळात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले. 6 दिवसांनी, 8 दिवसांनी कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली. या काळात दिवसाला कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 60 टक्‍के होते; मात्र कोरोनाचा कहर कमी होत असून, रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण 167 दिवसांवर गेले आहे, तर पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 55 ते 60 टक्‍क्‍यांवरून 8 टक्‍के इतके खाली आले आहे. त्यामुळे 167 दिवसांनी दुसरी लाट येणार नाही, यासाठी सर्वांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे.