Main Featured

Jio युजर्ससाठी खुशखबर

jioReliance Jio ने नुकतंच पोस्टपेड प्लान लॉन्च केला आहे. या पोस्टपेडचं नाव Jio Postpaid Plus असं आहे. कंपनीने दुसऱ्या कंपन्यांना टक्कर देण्याच्या उद्देशाने हे प्लान्स आणले आहेत. या नव्या पोस्टपेड प्लानमध्ये Netflix, Amazon Prime आणि Disney Hotstar सारखे OTT सब्सक्रिप्शन्स फ्रीमध्ये देण्यात येत आहेत. त्याशिवाय या सर्व्हिसमध्ये कंपनी इन-फ्लाइट कनेक्टिव्हही ऑफर करत आहे.

Must Read

1) मराठा संघटनांकडून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे

2) आता येतंय Green Ration Card

3) टीव्ही टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश; ‘रिपब्लिक’सह ३ चॅनल्सची चलाखी

4) क्रीडा विभागातून कुस्तीपटू बबीता फोगटचा राजीनामा

5) COVID-19 : मॉडर्ना कंपनीने कोरोना लशीसंदर्भात घेतला मोठा निर्णय

6) प्रकाश आंबेडकर यांचे वादास निमंत्रण…


रिलायन्स जीओने JioPostpaid Plusची सुविधा घेणारे अन्य टेलिकॉम कंपन्यांचे युजर्स, आपल्या क्रेडिट लिमिट carry forward करू शकत असल्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांना कोणतंही अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नसल्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.


Reliance Jio त्या सर्व युजर्ससाठी एक नवी carry-forward क्रेडिट लिमिट सुविधा देत आहेत, जे कोणत्याही अन्य सर्व्हिसमधून Jio पोस्ट-पेड नेटवर्कवर मायग्रेट करू इच्छितात. कंपनी नव्या सिम कार्ड्सची फ्री होम डिलिव्हरीही करत आहे. कंपनीने प्रीपेड कनेक्शनमधून पोस्टपेड किंवा पोस्टपेडमधून पोस्टपेड प्लस कनेक्शन मिळवण्याचा ऑप्शनही दिला आहे.


Jio Postpaid Plus कनेक्शन घेण्यासाठी -


- ज्या पोस्ट-पेड नंबरला जिओमध्ये स्विच करायचं आहे, त्या नंबरच्या व्हॉट्सअपवरुन 8850188501 या क्रमांकावर hi लिहून पाठवा.

- त्यानंतर सध्या वापरात असलेल्या ऑपरेटरचं पोस्ट-पेड बिल अपलोड करा.

- Jio Postpaid कनेक्शनसाठी, नव्या Jio सिमच्या होम डिलिव्हरीसाठी Jio ची वेबसाइट किंवा 1800 88 99 88 99 या क्रमांकावर कॉल करा. त्यानंतर Jio पोस्टपेड प्लस सिम कार्ड घरी पोहचेल. ग्राहक Jio स्टोर किंवा रिलायन्स डिजिटल स्टोरवरही सिम कार्ड खरेदी करू शकतात.

- ग्राहक www.jio.com/postpaid वरही Jio पोस्टपेड प्लसबाबत माहिती मिळवू शकतात.


JioPostPaid Plus प्लान्स


Jio ने 399 रुपये, 599 रुपये, 799 रुपये, 999 रुपये आणि 1,499 रुपयांचे 5 पोस्टपेड प्लान आणले आहेत. या सर्व प्लान्समध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलसह बंपर डेटा ऑफर देण्यात येत आहे. नव्या Jio Postpaid Plus Plans मध्ये Netfix, Amazon Prime, Disney Plus Hotstar सारख्या OTT Apps चा एक्सेसही देण्यात येत आहे.