Main Featured

gold silver rate today- आज पुन्हा सोने आणि चांदीच्या दरात घसरण

gold silver rate today
gold silver rate today- कमॉडिटी बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये संध्याकाळी पाच वाजता सोन्याचा भाव ५०४ रुपयांनी कमी झाला असून तो १० ग्रॅमला ५००२२ रुपयांवर आला आहे. चांदीमध्ये ८४० रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा एक किलोचा भाव ५९७३१ रुपये आहे.

Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

याआधी सोमवारी सोने आणि चांदीमध्ये घसरण झाली होती. गुरुवारी १ ऑक्टोबर रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत किरकोळ वाढ झाली होती. गुरुवारी सोने ५०५७० रुपये तर चांदी ६११४५ रुपयांवर स्थिरावली होती. आज जागतिक कमॉडिटी बाजारात सोने दरात १.१४ टक्के घसरण झाली. सोन्याचा भाव २१.८० डॉलरने कमी झाला. आजचा सोन्याचा भाव प्रती औंस १८८७ डॉलर प्रती औंस आहे. चांदीचा भाव १.६३ टक्क्यांनी कमी झाला आहे. प्रती औंस चांदीचा भाव २३.५२ डॉलर (gold silver rate today)आहे.

डॉलरचे मूल्य वधारत असल्याने मंगळवारी जागतिक बाजाराता स्पॉट गोल्डचे दर १.८७ टक्क्यांनी घसरले व ते १८७७ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  (donald trump)यांना मागील आठवड्यात कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली. त्यामुळे सोन्याचे दर आणखी खाली आले.

पुढील निवडणुका होईपर्यंत अमेरिकी अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी अतिरिक्त मदतीच्या विधेयकाबद्दल चर्चा डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवली. यामुळे सोन्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.