Main Featured

आज सोन्याच्या किंमतीत वाढ, असे आहेत आजचे दर

gold price todayगेल्या काही दिवसांपासून सोन्याचे (gold silver price today)दर वर-खाली होत आहेत. सोन्यात घसरण झाल्याचे चित्र काही दिवसांपूर्वी दिसत होते, मात्र आज MCXव डिसेंबरच्या सोन्याच्या किंमतीत 124 रुपयांनी वाढ झाली. मंगळवारी प्रति 10 ग्रॅम 50 हजार 245 रुपयांवर सोन्याचे दर होते, आज 50 हजार 369 रुपये सोने झाले आहे. सकाळी 10 वाजता 131 रुपयांच्या वाढीसह सोनं 50 हजार 376 रुपयांवर ट्रेड करत होता. फेब्रुवारीच्या सोन्याच्या किंमतीही 202 रुपयांनी वाढल्या.

Must Read

तेजस्विनी पंडित फोटोशूट शेअर करत म्हणाली- "वाट पहाते मी गं...

मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात प्रति तोळा सोन्याची किंमत कमी होऊन 52 हजारांच्या खाली आली होती. या दरम्यान चांदीचे दर 875 रुपयांनी उतरले होते. मागील सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 52 हजार 122 रुपये होते. तर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति औंस 1919 डॉलर होता तर चांदीची किंमत 24.89 डॉलर प्रति औंस होती.

का घसरत आहेत सोन्याच्या किंमती?

सोन्याच्या किंमतीत (gold silver price today) झालेल्या घसरणीमागचे कारण म्हणजे 2 महिन्यांत रुपयांत आलेली तेजी. यामुळे मंगळवारी फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम 0.27 टक्क्यांनी वाढून 50,970 रुपयांवर गेले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये डिसेंबरच्या सोन्याचे वायदेचे भाव 177 रुपयांनी म्हणजेच 0.27 टक्क्यांनी वाढले होते. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव 0.20 टक्क्यांनी घसरून 1,925 डॉलर प्रति औंस झाले.

सोन्यात चढ-उतार होत राहणार

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे कमोडिटी रिसर्चचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांचे म्हणणे आहे की सोन्याची किंमत 50 हजार रुपयांच्या उंचीवरून खाली आली आहे, तर चांदी 60 हजार रुपयांच्या श्रेणीत आली आहे. त्यांचा असा विश्वास आहे की येत्या काही दिवसांतही चढउतार चालूच राहू शकतात.