gold price today
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत होते. विशेष म्हणजे सोन्याचे भाव पुन्हा एकदा उतरले आहेत. सोन्याच्या दरात घसरण झाली असून, चांदीसुद्धा 800 रुपयांनी स्वस्त झाली आहे. सुवर्ण बाजार उघडताच सोन्याच्या किमतीत आज (gold price today) तीव्र घट झाली. सकाळी 09.30 वाजता मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज (MCX)वर सोन्याच्या भावात 10 ग्रॅमसाठी 441 रुपयांची घसरण झाली. सोने आज 50085.00 रुपयांवर व्यापार करत होते. त्याचबरोबर चांदी 881.00 रुपयांनी घसरून 59690.00 रुपये प्रतिकिलोवर व्यापार करीत आहे.(gold and silver price today down)

Must Read

1) आमदारानं 19 वर्षांच्या मुलीशी केलं लग्न

2) मराठमोळी नेहा पेंडसे एथनिक ड्रेसमध्ये दिसते झक्कास..! Photos

3) राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड

4) शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपा नेत्याला अटक

5) Video: १०३ वर्षीय आजोबांनी १४ हजार फुटांवरुन मारली उडली

HDFC सिक्युरिटीजच्या माहितीनुसार, मंगळवारी दिल्लीतील 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे भाव 454 रुपयांनी वाढून 51,879 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1900 डॉलरवर बंद झाले. मंगळवारी एक किलो चांदीचा दर 751 रुपयांनी वाढून 63,127 रुपये प्रतिकिलो झाला. बाजार तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत आणखी घसरण होऊ शकते. सोन्याचे भाव दहा ग्रॅमसाठी 48 हजार रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. त्याचबरोबर दिवाळीपर्यंत पुन्हा एकदा सोने महाग होण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या अखेरीस सोने उच्चांकी पातळी गाठू शकते.


मोतीलाल ओसवाल यांचे सहकारी उपाध्यक्ष अमित ससेजा यांच्या मते, स्पॉट गोल्डला (gold price today)  प्रति औंस 1,840 डॉलर्सचा चांगला आधार आहे. प्रत्येक वेळी 500 ते 600 रुपयांची घसरण झाल्यानंतर सोन्यात गुंतवणूक करता येऊ शकते, असाही त्यांनी गुंतवणूकदारांना सल्ला दिला आहे. अँजल ब्रोकिंगच्या कमॉडिटी अँड करन्सीचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या माहितीनुसार, दिवाळीपर्यंत सोने पुन्हा 52,500 ते 53,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. त्याचवेळी एमसीएक्सवर सोन्याची किंमत 55000 आणि किरकोळ सराफामध्ये 57000पर्यंत जाऊ शकते.


जागतिक बाजारपेठेची काय आहे अवस्था?


जागतिक बाजारपेठेविषयी बोलायचं झाल्यास अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे बाजारपेठांवर मोठा परिणाम झाला आहे. सोमवारी जागतिक बाजारात सोन्याचा भाव 1900 डॉलर प्रति अंशावर स्थिर राहिला. मागच्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतीवर डॉलरचा भयंकर परिणाम झाला होता. पण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी डॉलरची किंमत घसरल्यामुळे गुंतवणूकदारांना सोनं खरेदी करण्याची मोठी संधी मिळाली आहे.


दिवाळीपर्यंत वाढतील सोन्याचे भाव


गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या अनेक घटनांचा थेट परिणाम सराफा बाजारावर झाला होता. अशात आता भारतात धनत्रोयदशी आणि दिवाळी असे मोठे सण येत आहेत. त्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा वधारण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत 60 ते 65 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचेल, असं बोललं जात आहे.