Main Featured

Gold Rate: सोन्याच्या किंमतीने मोडला रेकॉर्ड

gold silver rate
gold silver rate- आंतरराष्ट्रीय बाजारानंतर (market) आता घरेलू बाजारातही सोन्याचे भाव सातत्याने कमी होत आहे. भारतात आज पुन्हा एकदा वायदा भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. एमसीएक्सवर डिसेंबरच्या सोन्याचा (gold silver rate) वायदा भाव हा 50,653 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे तर चांदीचा वायदा भाव 61,512 रुपये प्रति किलोग्रॅमवर घसरला आहे. 

नक्की वाचा 

1) हिमालयात फुलला दुर्मिळ ब्रह्मकमळांचा मळा

2) एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावरून शिवसेनेमध्ये नाराजी       का?

3) देशाला पहिला ऑस्करचा मान पटकावून देणाऱ्या मराठमोळ्या भानू अथैय्या यांचं निधन

 4)  कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

5) नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांची आॅनलाइन पायाभूत चाचणी


त्यामुळे सोन्यामध्ये (gold) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारतात 17 ऑक्टोबरपासून नवरात्रीचा उत्सव सुरू होणार आहे. त्यामुळे सोन्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे.

पण जर आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकी डॉलर (doller)वधारले तर घरेलू बाजारातही सोन्याचे किंमती आणखी कमी होऊ शकतात. खरंतर, या आठवड्यामध्ये सोन्या-चांदीच्या भावांमध्ये अस्थिरता पाहायला मिळाली. मागच्या सत्रामध्ये सोनं आणि चांदीची किंमत 0.3 टक्क्यांनी वाढली होती. ऑगस्ट महिन्यात तर सोन्याचे किंमतीने (gold silver rate) सर्व रेकॉर्ड मोडत प्रति 10 ग्रॅम 56,200 रुपये गाठले होते. यावेळी चांदीही उच्च पातळीवर 80,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली होती.


जागतिक बाजारात काय आहेत सोन्याचे दर?


जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर आणि अनुदानपर पॅकेज यांच्यामधील अनिश्चिततेमुळे आज सोन्याचे दर 0.1 टक्क्यांनी घसरून 1,906.39 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. या आठवड्यात आतापर्यंत भाव एका टक्क्यापेक्षा जास्त घसरले आहेत. इतर मौल्यवान धातूंमध्ये चांदी 0.2 टक्क्यांनी घसरून 24.26 डॉलर प्रति औंसवर तर प्लॅटिनम 0.2 टक्क्यांनी वधारून 866.05 डॉलरवर पोहोचला आहे.


अमेरिकेत (United state) पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांआधी काही अनुदानपर घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. जेव्हा अर्थव्यवस्था कमकुवत होते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात आणि जेव्हा अर्थव्यवस्था चांगली असते तेव्हा सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण होते.


दिवाळीपर्यंत वाढतील सोन्याच्या किंमती येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंमती आणखी घसरू शकतात. पण दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमती मोठ्या झपाट्याने वाढतील. दिवाळीपर्यंत सोनं 50000-52000 रुपये प्रति 10 ग्रॅम होण्याची शक्यता आहे.