gold silver price todaygold silver price today- भारतामध्ये सणासुदीच्या काळात सोनेखरेदी करणं शुभ मानलं जातं. विशेषत: दिवाळी आणि धनत्रयोदशी दिवशी मोठ्या प्रमाणात सोनेखरेदी केली जाते. सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहेत. गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 121 रुपये प्रति तोळाने कमी झाल्याने नवे भाव 50,630 रुपये प्रति तोळा आहेत. या दिवाळीला तुम्ही सोनेखरेदी करणा असाल तर त्याविषयी सर्व माहिती असणे गरजेचे आहे.

कोरोनाचे संक्रमण वाढल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता

या आठवड्यातील बुधवारी जगभरात कोरोनाचे 5 लाख नवीन रुग्ण आढळून आले. आतापर्यंतचा हा सर्वोच्च आकडा आहे. कोरोनामुळे केवळ इक्विटीवर दबाव वाढला नसून सोन्यामध्ये (gold silver price today)देखील गुंतवणूक वाढली आहे. पण कोरोनामुळे गुंतवणुकदारांच्या समस्या वाढत आहेत. कोरोना व्हॅक्सिनबाबतची अनिश्चितता देखील सोन्याच्या किंमतीवर परिणाम करत आहे. मात्र या सणासुदीच्या काळात सोन्याचे दर कमी होण्याची अपेक्षा अनेकजण करत आहेत.

Must Read 

कसे वाढले सोन्याचे दर?

युरोपीय देशात कोरोनाचा आकडा वाढल्यानंतर सोन्याच्या किंमती अधिक प्रमाणात वाढला. ऑगस्टमध्ये सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावर अर्थात 2,050 डॉलर प्रति औंस पोहोचले होते. ऑक्टोबरमध्ये हे दर 1880 डॉलर प्रति औंस आहेत. भारतात ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 या सर्वोच्च स्तरावर होते तर ऑक्टोबरमध्ये 51 हजारांच्या आसपास आहेत. कोरोनामुळे शेअर मार्केटमध्ये अस्थिरता आहे. याचाही सोन्यावर परिणाम होत आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक देशांच्या केंद्रीय बँका भविष्याचा विचार करता अधिक सोनेखरेदी करत आहे. त्यातच अमेरिका-चीन व्यापार तणाव आणि भारत-चीन सीमावाद या प्रकरणात अनिश्चितता आणखी वाढवत आहे.

सध्या सोन्यात गुंतवणूक करायला हवी का?

गुंतवणुकदारांनी सोनेखरेदी करताना ही बाब ध्यानात घ्यायला हवी की, ही खरेदी दीर्घकालीन फायद्यासाठी आहे. कारण गेल्या 15 वर्षात सोन्याचे दर जवळपास 7000 रुपये प्रति तोळाने वाढले आहेत. अशावेळी गुंतवणुकदारांना त्यांच्या सोन्याच्या पोर्टफोलिओमध्ये 5 ते 10 टक्क्यांमध्ये कुठेही गुंतवणूक करायला हवी. दिवाळीव्यतिरिक्त देखील गुंतवणुकदारांनी मासिक किंवा त्रैमासिक आधारावर सोन्यात गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

दिवाळीमध्ये मिळेल चांगल्या कमाईची संधी

ज्या ग्राहकांनी सॉव्हरेन गोल्ड बाँड्समध्ये (SGB - Sovereign Gold Bonds) सर्वात आधी गुंतवणूक केली होती, त्याना दुप्पट कमाईची संधी आहे. 2015 मध्ये सॉव्हरेन बाँड लाँच झाले होते. यावेळी लाँच झालेल्या बाँडचा प्रीमॅच्यूअर रिडम्प्शनचा कालावधी 2020 नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. त्यावेळी गोल्ड बाँडची किंमत 2683 रुपये प्रति ग्रॅम होती.