Main Featured

"गोकुळ' आणणार "टेट्रा पॅक' दूध


                                              जिल्ह्यात दुग्ध क्रांती (Dairy Revolution) आणून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाकडून (गोकुळ) आता आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करून "टेट्रा पॅक (Tetra pack) मधील दूध बाजारात आणले जाणार आहे. येत्या शनिवारी (ता. 17) या नव्या उपक्रमाचे "लॉचिंग' होत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रात ब्रॅंड मिळवलेल्या "गोकुळ' ने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या दिशेने नवे पाऊल टाकले आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीबरोबर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाने चांगलाच हातभार लावला आहे. त्याला "गोकुळ' ची चांगली साथ असून दर दहा दिवसाला दुधाचे पैसे, विविध सुविधा, वासरू संगोपनसारख्या योजना यातून या व्यवसायाकडे अधिकाधिक तरूणांनी सहभागी व्हावे यासाठी संघाचे प्रयत्न सुरू आहेत. सद्या संघाकडून संकलित दुधावर प्रक्रिया करून ते बंद पिशवीतून विकण्याचे काम केले जाते. लोणी, तूप, श्रीखंड यासारख्या उपपदार्थ निर्मितीतूनही संघाने आपले बाजारपेठेतील नांव कायम ठेवले आहे. मुंबई, पुणे या संघाच्या पिशवी बंद दुधाच्या मुख्य बाजारपेठा आहेत. 

Advertise


Must Read

1) ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलणार

2) आता मोबाईलमधील प्रायव्हेट डेटा राहील १०० टक्के सुरक्षित

3) महेंद्रसिंग धोनीच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली

4) PHOTO:अमृता खानविलकरने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट

5) विद्यापीठाच्या परीक्षांबाबत गोंधळ; प्रवेशपत्रात चुका


दूध हा नाशवंत पदार्ध आहे, जास्तीत जास्त 24 तासांपेक्षा जास्त काळ दूध टिकत नाही. त्यामुळे दूध पावडर व इतर उपपदार्थांशिवाय संघाकडून परदेशात दूध पाठवले जात नव्हते. "टेट्रा पॅक' दुधासाठी आवश्‍यक यंत्रणा संघाकडे नाही, ती बसवायची झाली तर त्याचा खर्च मोठा आहे. शिवाय अशा दुधाला स्थानिक पातळीवर किती प्रतिसाद मिळेल याविषयी साशंकता होती. त्यामुळे या प्रक्रियेकडे संघाने फारसे लक्ष दिले नव्हते. पण आता परदेशातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन "गोकुळ' ही "टेट्रा पॅक' दूध उत्पादनात उतरत आहे. सुरूवातीला अर्धा लिटरच्या पाऊचमध्ये हे दूध वाजारात आणले जाणार आहे. येत्या शनिवारी (ता. 17) संघाच्या गोकुळ शिरगांव येथील कार्यालयात या नव्या उत्पादनाचे "लॉचिंग' होणार आहे. 


दृष्टीक्षेपात "टेट्रा पॅक' दूध 

दुधाचा प्रकार-टोन्ड दूध 
फॅट - 3.0 ते 3.5 
एसएनएफ- 8.5 ते 9.0 टक्के 
कार्यकाल - 180 दिवस (रूम टेंपरेचरला) 
सद्याचा प्रती लिटर दर - 64 रूपये 

"महानंद' मध्ये प्रक्रिया 

सद्या वारणा, शासनाचा महानंद प्रकल्प व बारामती येथील डायनॅमिक डेअरीकडूनच "टेट्रा पॅक' दूध बाजारात आणले जाते. "गोकुळ' ने सुरूवातीला "महानंद' कडून हे उत्पादन तयार करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी मुंबई येथील दूध महानंदला पाठवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दररोज 50 हजार लिटर "टेट्रा पॅक' दूध बाजारात आणले जाईल. त्याचा प्रतिसाद पाहून यात वाढ करण्यात येईल. मुंबईहून रिकाम्या येणाऱ्या टॅंकरमधून हे दूध कोल्हापुरात आणण्याचे नियोजन आहे.