gogi-tarak-mehta-threatens-kill

‘तारक मेहता का उलटा चश्मा’ 'Tarak Mehta's inverted glasses' या विनोदी मालिकेत गोगीची भूमिका साकारणारा अभिनेता साम शाह याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही घटना त्याच्या निवासस्थानाजवळ घडली असून याप्रकरणी त्याने बोरिवली पोलिसांत तक्रार दाखल केली.

शहा याच्याशी काही मुलांनी गैरवर्तन करत त्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. २७ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला. त्यानुसार पोलिसांनी इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले. या फुटेजच्या मदतीने त्या मुलांचा शोध सुरू असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तिसऱ्यांदा हा प्रकार त्याच्यासोबत घडल्याचेही त्याने सांगितले.

शहाने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकली. यात ‘दोन दिवसांपूर्वी हा माणूस माझ्या इमारतीत आला आणि कारण नसताना शिवीगाळ करत ठार मारण्याचीही धमकी दिली. त्यामुळे चाहत्यांना याची माहिती मी देत आहे. कारण माझे जर काही बरेवाईट झाले तर त्याबाबत माझे मित्र आणि कुटुंबाला याची माहिती असणे गरजेच आहे’, असे त्याने यात म्हटले आहे.