Main Featured

अॅमेझॉन-फ्लिपकार्ट सेलः फ्रीमध्ये मिळणार Galaxy Note 10 Lite

The Great Indian Festival Sale





फेस्टिव सीजन सुरू करण्यात येत आहे. शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉन (amazon sale)-फ्लिपकार्टआधी अनेक टीज करण्यात येत आहे. अॅमेझॉनवर The Great Indian Festival Sale आणि फ्लिपकार्टवर Big Billion Days सेलची सुरुवात १७ आणि १६ ऑक्टोबरला होत आहे. यावेळी अनेक ऑफर्स मध्ये ग्राहकांना Samsung Galaxy Note 10 Lite यासारखे प्रीमियम फोन फ्रीमध्ये मिळणार आहे.

Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

दक्षिण कोरियाची टेक ब्रँड कंपनी सॅमसंग खूप सारे ऑफर्स देत आहे. कंपनी स्मार्टफोन्सपासून इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत रेंजवर मोठी सूट देत आहे. कंपनीने Spacemax Family Hub आणि Curb Maestro रेफ्रिजरेटर्स लाँच केले आहे. यावर मिळणाऱ्या ऑफर्स जबरदस्त आहेत. या दोन्ही प्रोडक्टवर ग्राहकांना ३५ हजार ते ४० हजार रुपयांपर्यंतचे महागडे फोन फ्रीमध्ये मिळणार आहे.

कॅशबॅक सोबत या अप्लायन्सेजवर कंपनी लो कॉस्ट ईएमआय ऑप्शन आणि एक्सचेंज ऑफर्स घेवून आली आहे. कंपनीने या प्रीमियम गॅलेक्सी फोनचे नाव आतापर्यंत उघड केले नाही. जे डिव्हाइसेज या रेफ्रिजरेटवर मिळू शकतात त्यात Galaxy S10 Lite, आणि Galaxy A51 5G याशिवाय Samsung Galaxy Note 10 Lite चा समावेश आहे.


कंपनीने Samsung Spacemax Family Hub फ्रिज यावर्षी जुलैमध्ये लाँच केले होते. IoT इनेबल्ड रेफ्रिजरेटर मध्ये ऑटोमेटेड मील प्लॅनिंग, फ्रीजमध्ये सामान ठेवण्यासाठी खास फीचर आणि बाकी स्मार्ट अप्लायन्सेजने कनेक्टिविटी सपोर्ट मिळतो. या फ्रीजची किंमत १,१९,९०० रुपये आहे. तसेच कंपनी ३९,९९९ रुपयांच्या सुरवातीच्या Galaxy Note 10 Lite किंवा ४२,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या Galaxy S10 Lite फ्री देवू शकते.