Main Featured

महिलांच्या बँक खात्यामध्ये 2.20 लाख जमा करतंय सरकार?

pradhanmantri nari shakti yojana form
व्हिडीओ प्लॅटफॉर्म असणाऱ्या YouTube वर सध्या एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकारकडून (central government)सर्व महिलांच्या खात्यामध्ये 'पंतप्रधान नारी शक्ती योजने' (pradhanmantri nari shakti yojana form)अंतर्गत 2 लाख 20 हजार रुपये ट्रान्सफर करण्यात येत आहेत. 

नक्की वाचा 

1) हिमालयात फुलला दुर्मिळ ब्रह्मकमळांचा मळा

2) एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावरून शिवसेनेमध्ये नाराजी       का?

3) देशाला पहिला ऑस्करचा मान पटकावून देणाऱ्या मराठमोळ्या भानू अथैय्या यांचं निधन

 4)  कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

5) नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांची आॅनलाइन पायाभूत चाचणी

जर असा कोणताही मेसेज तुम्हाला मिळाला असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये. तुम्ही अशा मेसेजपासून सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. केंद्र सरकारचे अधिकृत ट्विटर (twitter)हँडल असणाऱ्या पीआयबी (Press Information Bureau) फॅक्ट चेकने हा दावा खोटा असल्याचे ट्वीट शेअर केले आहे. पीआयबीने या व्हिडीओची पडताळणी करून दावा फेटाळला आहे, हा मेसेज बनावट असल्याचे PIB ने म्हटले आहे.

PIB फॅक्ट चेकमध्ये माहिती आली समोर

पीआयबी फॅक्ट चेकच्या ट्विटर (twitter) हँडलच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्यांचा पर्दाफाश केला जातो. सामान्य नागरिकांमध्ये जागरुकता पसरवण्याचे काम पीआयबीच्या माध्यमातून केले जाते. याप्रकारेच या योजनेबाबत पीआयबीकडून माहिती देण्यात आली आहे. अशी कोणतीच योजना नसल्याचे पीआयबीने म्हटले आहे.

पीआयबीचे असे म्हणणे आहे की, जर तुमच्याकडे कोणताही व्हायरल मेसेज आला आणि त्यामध्ये कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याचे सांगण्यात आले तर तसे अजिबात करू नका. सर्वात आधी त्या मेसेजची विश्वासार्हता तपासून घ्या आणि त्यानंतरच त्यावर विश्वास ठेवा. तुम्ही एखाद्या बनावट मेसेज किंवा लिंकवर क्लिक केल्यास ऑनलाइन फ्रॉड होण्याची शक्यता अधिक असते.