Main Featured

कोरोनाची लस तयार करणारे सायरस पूनावाला टॉप टेनमध्ये


forbes-list-2020-india

फोर्ब्स मॅगझिनने हिंदुस्थानातील शंभर श्रीमंत व्यक्तींची यादी गुरूवारी जाहीर केली. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्केसर्का मुकेश अंबानी  ( Mukesh Ambani) यांनी पहिले स्थान कायम राखले आहे. एक- दोन नव्हे तर सलग 13 वर्षे मुकेश अंबानी देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. मुख्य म्हणजे यावर्षी ते मागच्या वेळच्या तुलनेत आणखी श्रीमंत झाले आहेत. या यादीत कोरोना लसीवर काम करणाऱया सिरम इन्स्टिटय़ूटचे सायरस पूनावाला  (Cyrus Poonawalaपहिल्यांदा ‘टॉप टेन’मध्ये पोहोचले आहेत.

‘फोर्ब्स इंडिया रिच लिस्ट 2020’ च्या आकडेवारीनुसार, मुकेश अंबानी यांच्याकडे 88.7 अब्ज डॉलर्स संपत्ती आहे. गौतम अदानी दुसऱया क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 25.2 अब्ज डॉलर्स आहे. या यादीत तिसरे नाव शिव नाडर यांचे असून त्यांच्याकडे 20. 4 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

Advertise

नोकरी डॉट कॉमची मुख्य कंपनी इन्फो एज इंडिया लिमिटेडचे संस्थापक संजीव भिवचंदानी (SanjeevBhiwchandani) यांच्यासह देशातील नऊ उद्योगपती पहिल्यांदा देशातील टॉप 100 श्रीमंतांच्या यादीत पोचले आहेत. संजीव भिवचंदानी यांची एकूण संपत्ती 2.1 अब्ज डॉलर असून यादीत ते 68 स्थानावर आहेत. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, पहिल्या 100 च्या यादीतील हिंदुस्थानींनी एकूण 517.5 अब्ज डॉलर्सची संपत्ती गोळा केली आहे.

मुकेश अंबानींची संपत्ती वाढली

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वर्षभरात 37.3 अब्ज डॉलरचा नफा झाला आहे. जियो प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेलमध्ये येणाऱया जागतिक गुंतवणूकीमुळे अंबानी यांची संपत्ती वाढलेय. फेसबुक, गुगल, केकेआर, सिल्क्हर लेक यांसारख्या कंपन्यांनी जियो आणि रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक केली आहे.

सायरस पूनावाला यांचा नफा वाढला

कोरोनावर लस तयार करणाऱया सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे सीईओ सायरस पूनावाला यांच्या एकूण संपत्तीत वाढ झाली आहे. पूनावाला यांची संपत्ती 11.5 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. त्यामुळे त्यांनी टॉप 10मध्ये धडक मारत सहावे स्थान पटकावले आहे.

dvd

तीन महिलांचा समावेश

ओपी जिंदाल ग्रुपच्या सावित्री जिंदाल 6.6 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह 19 व्या स्थानाकर आहेत. बायोकॉनच्या किरण मुजूमदार शॉ 4.6 अब्ज डॉलरसह 27 व्या स्थानावर आहेत. युएसव्हीच्या लीना तिवारी 47 व्या क्रमांकावर असून संपत्ती 3 अब्ज डॉलर आ