hasan mushrif

२०२१ च्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात सर्वप्रथम येण्यासाठी कागल शहर स्वच्छ सज्ज आहे, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ  (brand ambassador)यांनी व्यक्त केला. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या ‘आय लव्ह कागल’  लोगोच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. माणिक रमेश माळी होत्या.


मंत्री मुश्रीफ (hasan mushrif) म्हणाले, ‘‘स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा मी ब्रॅंड ॲम्बेसिडर (brand ambassador)आहे. झोकून देऊन काम केल्यामुळेच गेल्या वर्षीच्या अभियानात पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथम आणि देशात नवव्या स्थानावर आली. प्रत्येक शहरात घनकचऱ्याची समस्या असते; परंतु कागलमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावण्यासाठी पालिका सिद्ध झाली आहे.’’

Must Read

1) अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार येस बँकेच्या ताब्यात

2) अल्पवयीन मुलीवर पुण्यात सामूहिक बलात्कार

3) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप

4) PHOTOS: 'मिर्झापूर 2' मधील डिप्पी खऱ्या आयुष्यात आहे भलतील ग्लॅमरस, See Pics

5) टवटवीत आणि चमकदार त्वचेसाठी नियमित करा फक्त 6 योगासनं


उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक भैय्या माने, मुख्याधिकारी पंडित पाटील, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, नितीन दिंडे, बाबासाहेब नाईक, आनंदा पसारे, नूतन गाडेकर, माधवी मोरबाळे, मंगल गुरव, पद्मजा भालबर, आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे, संग्राम लाड आदींसह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते.