एका वृत्तवाहीनेने केलेल्या तपासणी नुसार सध्या मोठ्या प्रमाणावर व्हाट्सअप (Whatsapp) स्टेटसच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा मेसेज वायरल झाला आहे. तुम्ही व्हाट्सअपच्या मदतीने दिवसाला 500 रुपयापर्यंत पैसे कमवू शकता, असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. अनेक जणांच्या व्हाट्सअप स्टेटसला तुम्ही हा मेसेज पाहिला असेल.

Must Read

1) शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची सुपारी

2) येस बँकेप्रमाणेच पंजाब, महाराष्ट्र सहकारी बँक ठेवीदारांना...

3) CSK च्या सुपर फॅनचे दिड लाख फिटले; धोनीनं खुद्द घेतली दखल (VIDEO)

4) खासदार उदयनराजे सरकारवर भडकले

5) राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची संभाव्य यादी

पण खरंच व्हाट्सअपवर स्टेटस ठेवून तुम्ही पाचशे रुपये कमवू शकता का यासाठी व्हाट्सअप स्टेटसवर शेअर करण्यात आलेल्या एका मेसेजची आम्ही मदत घेतली. व्हाट्सअप स्टेटसमध्ये ज्या लिंकचा उल्लेख आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक किंवा ईमेल (E-mail) आयडी मागितला जातो.

त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागतो. हे केल्यानंतर ‘तुमचं अकाऊंट तयार झालं आहे’, असं वेबसाईटकडून सांगण्यात येतं. तुम्हाला हा स्टेटस व्हाट्सअपला शेअर करायला सांगितलं जातं. हे झाल्यानंतर शेअर केलेल्या व्हाट्सअप स्टेटसचा स्क्रीनशॉट काढून पुन्हा वेबसाईटवर व्हेरिफाय बटनावर क्लिक करावं लागतं. आणि इथेच तुम्ही फसवणूक होते.

व्हेरिफाय बटणावर क्लिक केल्यानंतर अचानक तुमच्यापुढे अनेक जाहिराती यायला लागतात आणि याच ठिकाणी तुमची फसवणूक होते.

तुमच्यावर जाहिरातींचा भडीमार होऊ लागतो आणि त्याचेच पैसे वेबसाईट (Website) बनवणाऱ्याला मिळतात. त्यामुळे व्हाट्सअप स्टेटसच्या मदतीने अशा प्रकारे दिवसाला पाचशे रुपये मिळण्याची माहिती पूर्णपणे खोटी आहे. तसेच पैशाच्या आमिषाला बळी पडून तुमचा मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी अजिबात देऊ नका. यातून तुमची आर्थिक फसवणूक  (Financial fraud) होण्याचा धोका आहे.