Main Featured

एकनाथ खडसे 10-10 च्या मुहूर्तावर करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

sharad pawar


politics-गेल्या काही वर्षांपासून भाजपवर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar)यांची भेट घेण्याची शक्यता आहे. पवारांना भेटण्यासाठी खडसे कालच मुंबईत दाखल झाल्याने ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. (BJP leader Eknath Khadse will meet NCP president Sharad Pawar today)


Must Read

1) आमदारानं 19 वर्षांच्या मुलीशी केलं लग्न

2) मराठमोळी नेहा पेंडसे एथनिक ड्रेसमध्ये दिसते झक्कास..! Photos

3) राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड

4) शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपा नेत्याला अटक

5) Video: १०३ वर्षीय आजोबांनी १४ हजार फुटांवरुन मारली उडली


गेल्या काही दिवसांपासून एकांतवासात असलेले एकनाथ खडसे कालच मुंबईत आले आहेत. ते आज शरद पवारांना भेटणार असून राष्ट्रवादीत जाण्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला असून खडसे-पवार भेटीवर राजकीय वर्तुळाचं (politics)लक्ष लागलं आहे.


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. त्यात महाराष्ट्रातून पंकजा मुंडे, विनोद तावडे आदी नेत्यांचा समावेश करण्यात आला. मात्र, या कार्यकारिणीत खडसेंना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे खडसे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याचा कयासही वर्तवण्यात येत होता.


अशात गेल्या आठवड्यात शरद पवार (sharad pawar) आणि पक्षातील जळगावमधील नेत्यांसोबत एक बैठक केली होती. या बैठकीत खडसेंच्या प्रवेशावर चर्चा झाल्याचं बोललं जात होत. त्यानंतर आता खडसे मुंबईत आल्याने त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला आहे.