अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) च्या (Enforcement Directorate) अधिकाऱ्यांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश सूरत पोलिसांनी (Surat Police) केला आहे. मुंबईतील (Mumbai ED Officer) ईडीच्या अधिकाऱ्यांवर जप्त करण्यात आलेल्या गाड्या विकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सूरत ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी  आयआरएस अधिकारी प्रवीण साळुंखेंसह (Ed officer pravin salunkhe)आणखी एका जणाला आरोपी केले आहे. या प्रकरणी आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या प्रकरणामध्ये जप्त करण्यात आलेल्या गाड्यांचीच विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे, यात ईडीच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचे समोर आले आहे. सूरत ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात मुंबईत कर्तव्यावर असेल्या दोन ईडीच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 2010 बॅचचे आयआरएस अधिकारी (iras officer) प्रवीण साळुंखे आणि  ईडी इंस्पेक्टर भेराराम या दोघांना आरोपी करण्यात आले आहे.

सूरतचे सह पोलीस आयुक्त भार्गव पंड्या यांनी सांगितले की, 'काही दिवसांपूर्वी ईडी आणि सीबीआयने जप्त केलेले ट्रक आणि कंटेनर हे भिंत तोडून बाहेर नेले होते. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संतोष नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला. संतोषचा मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅप चॅट तपासण्यात आले. यात त्याने प्रवीण साळुंखे यांच्याशी संवाद साधल्याचे समोर आले. जप्त केलेली वाहनं ही बाजारात 2 लाख रुपयांमध्ये विकण्यात आली होती. यात संतोषला  20 ते 30 हजार रक्कम प्रती कंटेनर भेटत होती. उरलेली रक्कम ही ईडीचे अधिकारी खिश्यात घालत होते.'

Must Read 

1) सरकारने लागू केली आरोग्य विम्याची नवी योजना

2) IPL 2020 : बुमराहचा स्पेशल रेकॉर्ड

3) 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील शनायाने शेअर केला साडीतला फोटो

4) Gold Price Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा एकदा वधारलं सोनं,

5) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय़

6) युजवेंद्र चहलच्या होणाऱ्या पत्नीचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल....


2018 मध्ये बँक ऑफ इंडियाच्या रिकव्हरी मॅनेजरने सूरतमधील सिद्धी विनायक लॉजिस्टिकविरोधात तक्रार दाखल केली होती.  सिद्धी विनायक लॉजिस्टिकने 125 कोटींचे कर्ज घेतले होते. पण, कर्जाची परतफेड केली नव्हती. त्यामुळे  207 ट्रक आणि कंटेनर सीबीआय आणि ईडीने जप्त केले होते. पण, ईडीच्या अधिकाऱ्यांनी कंटेनरचे नंबर प्लेट बदलले आणि बाजारात विकून टाकले.

दरम्यान, संतोषसह आणखी दोन जणांना सूरत ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचे मोबाइल जप्त करण्यात आले असून डेटा काढण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच या दोन्ही अधिकाऱ्यांना अटक करण्यात येणार आहे.