धक्कादायक बातमी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (donald trump)यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

त्याआधी डोनाल्ड ट्रम्प (donald trump) यांची सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण तात्काळ क्वारंटाइन झाल्याचे सांगितले आहे. डोनाल्ड ट्रम्प (us president) यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली.MUST READ


1) मला तेवढाच उद्योग नाहीय; पार्थ पवारच्या ट्विटवर अजित पवारांची प्रतिक्रिया2) जीएसटी संकलनात १० टक्के वाढ3) लॉकडाऊन काळातील हवाई तिकिटांचे पैसे मिळणार परत4) करोनाचा कहर : उपचार घेणाऱ्या करोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ5) एलओसीवर पाकचा गोळीबार; दोन जवान शहीद


ट्रम्प यांनी ट्विट करताना म्हटले आहे, मी आणि माझी पत्नी मेलेनिया कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलो आहोत. आम्ही यामधून लवकरच बाहेर पडू. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रचाराला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.


याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत आपली सल्लागार होप हिक्सला कोरोनाची लागण झाल्याचे सांगत आपण क्वारंटाइन होत असल्याचे सांगितले होते. अजिबात विश्रांती न घेता सतत काम करणाऱ्या होप हिक्सचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.