Main Featured

भाजपच्या नेत्याला विनयभंगाच्या गुन्ह्याखाली अटक


divekar-arrested-for-molestation

 पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर (Tanaji Divekar) यांना विनयभंगाच्या प्रकरणात  अटक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्या सुनेनंच दिवेकर यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

भाजपचे जिल्हा निमंत्रक, कार्यकारिणी सदस्य, माजी जिल्हा सरचिटणीस तानाजी दिवेकर यांच्यावर यवत पोलीस स्टेशनमध्ये सुनेवर विनयभंग (Debauchery) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तानाजी दिवेकर यांच्यासह इतर तीन जणांवर माननिक व शारीरीक छळ केल्याप्रकरणी ही यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertise

नक्की वाचा 

 1 ] मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या बैठकीला उदयनराजेंची दांडी 

 2 ] अमीषा पटेलने शेअर केला बोल्ड व्हिडीओ, झाली ट्रोल 

 3 ] SSR Death Case- अखेर रिया चक्रवर्तीची तुरुंगातून सुटका

 4 ] पोलार्डची सुपरमॅनगिरी! VIDEO पाहून तुम्हीच सांगा सर्वात बेस्ट कॅच कोणता?

 5 ] एकनाथ खडसे 10-10 च्या मुहूर्तावर करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

 6 ] आमदारानं 19 वर्षांच्या मुलीशी केलं लग्न

तानाजी दिवेकर यांनी आपला मुलगा पंकज दिवेकर यांच्या पत्नीला 'तुझ्या वडिलांच्या नावावर असलेला जनावरांचा गोठा तुझ्या नावावर करं आणि तुझ्या नावावर करून ते माझ्या नावावर करं, मला त्याच्यावर कर्ज काढायचे आहे' असं सांगून दमदाटी केली होती.

तसंच, 'मला मुलाच्या लग्नात झालेल्या सर्व खर्च परत दे' असा तगादा लावत दिवेकर यांनी शिवागीळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग केला.तानाजी दिवेकर यांच्या त्रासाला कंटाळून अखेर त्यांच्या सूनेनं सोमवारी 5 ऑक्टोबर रोजी यवत पोलीस स्टेशन गाठले. तानाजी दिवेकर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आपला मानसिक व शारीरीक छळ केला आहे, अशी फिर्याद यवत पोलीस स्टेशनला दिली आहे.

पंकज यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून यवत पोलीस स्टेशनला तानाजी दिवेकर यांच्यासह पत्नी (सासू) व दोन मुलांवर शारिरीक, मानसिक, दमदाटी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विनयभंगासह छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अखेर दोन दिवसांनी  दिवेकर यांना अटक करण्यात आली आहे.

तानाजी दिवेकर हे भाजपचे जिल्हा निमंत्रक, कार्यकारिणी सदस्य आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे दौंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.