district-angry-farmers-burnt-soybeans

निसर्गाने मारले अन् प्रशासनाने अव्हेरले... अशा कात्रीत अडकलेल्या एका शेतकऱ्याने Farmers चक्क सोयाबीन जाळून आपला संताप व्यक्त केला. मनिष जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे.यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटांनी ग्रस्त आहे. सुरवातीला दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. कशीबशी पैशाची जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी दुबार पेरणीही केली. 

Must Read 

1) खासदार उदयनराजे सरकारवर भडकले

2) राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची संभाव्य यादी

3) देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्लाज्मा उपचार

4) नगरपालिकेत राडा; ज्येष्ठ नगरसेवकाला धक्काबुक्की

5) बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी सोपे आणि प्रभावी आयुर्वेदिक उपाय

6) बाईक प्रेमींसाठी खूशखबर, हीरोची हार्ले डेविडसनसोबत हातमिळवणी

शेतकऱ्यांना पदरी दोन पैसे पडतील, अशी आशाही निर्माण झाले होती. पण परतीच्या पावसाने पिकांचे मातेरे केले. उरल्यासुरल्या आशाही नष्ट झाल्यात. अशाच शेतकऱ्यांपैकी एक आहेत महागावचे मनीष जाधव. पावसाने उसंत घेतल्याने त्यांनी सोयाबीन सोंगणीस सुरवात केली. सोयाबीनच्या नुकसानीची कल्पना अधिकाऱ्यांना दिली असता सरकारी निकषात आपला तालुका बसत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संतप्त झालेल्या मनीष यांनी सरकारचा निषेध व्यक्त करीत आपल्या शेतातील सोयाबीन पेटवून दिले. जिल्ह्यात शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने कंबरडे मोडले आहे. सरकारी निकष बदलून शेतकऱ्यांना सरसकट मदत देणे गरजेचे आहे.